• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पाकिस्तानी खेळाडूने कोहलीचा Video शेअर करण्याचं कारण काय? वनडे मालिकेदरम्यान दिला असा मेसेज

June 2, 2026 by admin Leave a Comment

विराट कोहलीने आयपीएल 2026 अंतिम फेरीत विजयी खेळी आणि संघाला जेतेपद मिळवून दिलं. विराट कोहलीने तरूणांना लाजवेल अशी खेळी केली. त्याने आपल्या बॅटिंग आणि फिल्डिंगमधून तरूण खेळाडूंना फिटनेस कसं असावं याचा आदर्श घालून दिला आहे. विराट कोहली जगभरातील नवोदित क्रिकेटपटूंसाठी आयकॉन आहे. त्याच्या खेळीतून शेकडो तरूणांना प्रेरणा मिळते. त्याचे भारताच नाही तर जगभरात चाहते. यात पाकिस्तानही अपवाद नाही. पाकिस्तानातही विराट कोहलीचे अनेक चाहते आहे. घात निवड होऊनही खेळण्याची संधी न मिळाल्याने पाकिस्तानी फिरकीपटू सूफयान मुकीम याने विराट कोहलीसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच स्वत:ला दिलासा देण्याचं काम केलं आहे. तसेच मनौधैर्य वाढवण्याचं प्रयत्न केला. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या वनडे मालिकेदरम्यान सुफियान मुकीमने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

विराट कोहलीचा पोस्ट केलेल्या व्हिडीओत काय आहे?

सुफियान मुकीमने वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्याच्या एक दिवस आधी ही पोस्ट त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केली होती. यामध्ये त्याने विराट कोहलीच्या एका वक्तव्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात विराट कोहली म्हणतो की, तुम्ही कितीही प्रयत्न करा, पण ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा देवाने तुम्हाला संधी दिली असेल, कारण देणारा सर्वशक्तिमान आहे. सुफियानने हा व्हिडीओ पोस्ट करण्याचं कारण काय आहे? हे विराट कोहलीच्या संदेशातून त्याला सांगायचं आहे. या व्हिडीओद्वारे त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.

Sufyan Muqeem’s Instagram Story has a deep meaning for those who understand pic.twitter.com/dGXYUdYX4C

— Pakistan Cricket Team USA FC (@DoctorofCricket) June 2, 2026

ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात सुफियान मुकीमला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं नव्हतं. तर दुसऱ्या वनडे आधी त्याला संघात स्थान मिळणार नाही हे आधीच कळलं होतं. त्यामुळे त्याने ही पोस्ट केली असणार यात शंका नाही. मुकीमने प्रभावी कामगिरी करूनही त्याला प्लेइंग 11मध्ये स्थान मिळत नसल्याने त्याची निराशा समजू शकतो. त्याने आतापर्यंत चार वनडे सामन्यात 8 विकेट घेतल्या आहेत. तर 19 टी20 सामन्यात 27 बळी घेतले आहेत. पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेतही त्याने 11 सामन्यात 22 विकेट काढल्या होत्या.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • लाजा सोडलेल्या पोरी… मराठी अभिनेत्रीने बोल्ड शूट करताच नेटकरी संतापले
  • मराठा ओबीसीमध्ये दुरावा निर्माण करणे बंद करा.. मनोज जरांगे पाटील संतापले…
  • Bank Strike: बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप, सणासुदीच्या काळात शटडाऊन, तारखा पाहा अन्यथा फेरी वाया जाईल
  • मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
  • भीषण अपघात, स्विफ्ट कार डिवायडर ओलांडून इनोव्हा कारवर आदळली, दोन आमदार जखमी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in