• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पाकिस्तानमध्ये हाहाकार उडणार… इराणपेक्षाही भयंकर वाट लागणार, बड्या नेत्यानेच दिली कबुली, अवघ्या 5-7 दिवसात…

April 28, 2026 by admin Leave a Comment


जागतिक व्यासपीठावर स्वतःला ‘मध्यस्थ’ म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानचे आता वांदे होण्याची चिन्ह आहेत. त्याचं कारण म्हणजे पाकिस्तानला आता एका गंभीर देशांतर्गत संकटाचा सामना करावा लागत आहे. पाकिस्तानच्या ऊर्जा आणि वित्त मंत्रालयांच्या एका निवेदनामुळे देशभरात खळबळ माजली आहे. देशातील कच्च्या तेलाचा साठा केवळ5-7 दिवस पुरेल इतकाच असून, डिझेल आणि एलपीजीसारख्या इतर इंधनांचा साठाही काही आठवड्यांत संपू शकतो असं सरकारनेच मान्य केलं आहे.

होर्मुझ सामुद्रधुनी बंद असल्यामुळे संकट

मध्य पूर्वेतील जो भू-राजकीय तणाव सुरू आहे, पाकिस्तानचे अचानक उद्भवलेले ऊर्जा संकट हे त्याच्याशीच थेट निगडित आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावामुळे, इराणने व्यापारी जहाजांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी अक्षरशः बंद केली आहे. जगातील अंदाजे 20% कच्चे तेल या अरुंद सागरी मार्गातून जाते. पाकिस्तान आपल्या ऊर्जेच्या गरजांसाठी प्रामुख्याने आखाती देशांकडून (सौदी अरेबिया, कुवेत, इत्यादी) होणाऱ्या आयातीवर अवलंबून आहे. ही सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे आणि जहाजांच्या कमतरतेमुळे पुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.

पेट्रोलियम मंत्र्यांची कबुली

इराण-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री अली परवेझ मलिक यांनी देशाच्या इंधन साठ्यांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. हे युद्ध लवकर संपण्याची शक्यता कमी आहे, त्यामुळे जागतिक ऊर्जा बाजारात मोठी अनिश्चितता निर्माण झाली असल्याचा इशारा त्यांनी ‘समा टीव्ही’च्या एका कार्यक्रमात बोलताना दिला.

एवढंच नव्हे तर त्यांनी या कार्यक्रमात एक हादरवणारा खुलासाही केला, तो म्हणजे, पाकिस्तानची ऊर्जा प्रणाली सध्या बाह्य धक्क्यांसाठी अत्यंत असुरक्षित आहे. पाकिस्तानकडे सध्या केवळ पाच ते सात दिवसांचा कच्च्या तेलाचा साठा आहे असं ते म्हणाले. आणि त्याहूनही अधिक चिंताजनक बाब म्हणजे पाकिस्तानकडे एका दिवसासाठी पुरेल इतका पेट्रोलचा (रिझर्व्ह) साठा नाही. डिझेलचा साठा 26-28 दिवस पुरू शकतो आणि एलपीजीचा साठा केवळ 15 दिवस पेरल, इतका आहे. तसेच विमान कंपन्यांसाठी इंधन टंचाईचा अधिकृत इशारा (NOTAM) जारी करणारा पाकिस्तान हा जगातील पहिला देश ठरला आहे.

अली परवेझ मलिक यांनी जागतिक बाजारातील तीव्र अस्थिरतेकडे लक्ष वेधत नमूद केलं की, दुबईतील कच्च्या तेलाच्या किमती इतिहासात कधीही १७० डॉलरच्या उच्चांकावर पोहोचल्या नव्हत्या. ही अस्थिरता पाहता, देशाची ऊर्जा साठवण क्षमता बळकट करणे ही आता एक तातडीची गरज बनली आहे असं ते म्हणाले.

कोविड सारखे लागणार निर्बंध ?

वाढती इधन टंचाई पाहता, इंधनाची बचत करण्यासाठी शहबाज शरीफ सरकार आता कठोर उपाययोजनांचा विचार करत आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्यासाठी देशभरात लॉकडाऊनसारख्या उपाययोजना लागू केल्या जाऊ शकतात. रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी करण्यासाठी कॉर्पोरेट आणि सरकारी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सूचना दिल्या जाऊ शकतात. शाळा आणि महाविद्यालये बंद करून शिक्षण पुन्हा ऑनलाइन पद्धतीने देण्याची योजना आखण्यात येत आहे. लोकांना खाजगी वाहनांचा वापर कमी करून कार शेअरिंगचा अवलंब करण्याचे आवाहन केले जात आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर, पाकिस्तानने अनेकदा इस्लामी देश आणि पाश्चात्य शक्ती यांच्यात स्वतःला ‘मध्यस्थ’ म्हणून स्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. इराम-अमेरिकेच्या वादातही तो शांतीदूत बनण्याच्या प्रयत्नात आहे, पण इतरांचे वाद सोडवण्याचा दावा करणारा हा देश स्वतःच्या मूलभूत गरजा (ऊर्जा सुरक्षा) पूर्ण करण्यात सपशेल अपयशी ठरत असल्याचं सध्या दिसून येत आहे. . परकीय चलन साठ्याचा अभाव आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (IMF) कठोर नियम या पार्श्वभूमीवर, हे तेल संकट पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठा धक्का ठरू शकतं.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Raja Shivaji: ‘राजा शिवाजी’मधील लहान मुलाच्या त्या सीनवर कात्री; सेन्सॉर बोर्डाने सुचवले हे मोठे बदल
  • Bacchu Kadu : बच्चू कडू यांना शिंदेंची मोठी ऑफर, आमदारकीसह सहा महिन्यात..पण एकच अट, दुसरी बाजू आली समोर
  • 5 दिवसांत 2000 कोटींची कमाई, जगभरातील सर्वांत मोठा बायोपिक; भाच्यानेच साकारली भूमिका
  • होर्मुज खाडीत भडका, रशियाने दिला अमेरिकेला चकवा, होर्मुज खाडीतून थेट 4710 कोटी रुपयांचे..
  • मैत्रिणीच्या वडिलांनी मारलं म्हणून रडत मित्राला फोन केला, पण त्याने…; डोंबिवलीत अनाथ तरुणीसोबत जे घडलं, ते वाचून थरकाप उडेल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in