• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मैत्रिणीच्या वडिलांनी मारलं म्हणून रडत मित्राला फोन केला, पण त्याने…; डोंबिवलीत अनाथ तरुणीसोबत जे घडलं, ते वाचून थरकाप उडेल

April 28, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यातच आता एका २१ वर्षीय अनाथ तरुणीसोबत घडलेल्या संतापजनक घटनेने डोंबिवली हादरली आहे. संकटात असलेल्या तरुणीला मदत करण्याऐवजी, स्नॅपचॅटवर ओळख झालेल्या एका नराधम मित्रानेच तिच्यावर बलात्कार करून तिची लूट केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी आरोपी क्रिश भोईर याला बेड्या ठोकल्या आहेत.

मदतीचा हात बनला घात

पीडित तरुणी अनाथ असून एका खासगी ठिकाणी काम करून आपला उदरनिर्वाह करते. काही दिवसांपूर्वी तिची एका मैत्रिणीच्या कुटुंबियांशी वादावादी झाली होती. या वादातून मैत्रिणीच्या वडिलांनी आणि इतर कुटुंबियांनी तिला बेदम मारहाण केली. या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी आणि पोलिसात तक्रार करण्यासाठी पीडितेने काही दिवसांपूर्वीच ‘स्नॅपचॅट’ (Snapchat) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ओळख झालेल्या क्रिश भोईर याला मदतीसाठी बोलावले.

पीडितेचा विश्वास होता की क्रिश तिला पोलीस स्टेशनला घेऊन जाईल. मात्र, क्रिशने तिला पोलीस स्टेशनला नेण्याऐवजी एका निर्जन स्थळी नेले. तिथे त्याने तिच्या असहायतेचा फायदा घेत तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. एवढ्यावरच न थांबता, त्याने तिचे ऑनलाइन पैसे लुटले. त्यानंतर तिच्या मोबाईलमधील सिमकार्ड काढून मोबाईलसह तिथून पळ काढला. या अत्याचारानंतर हतबल झालेल्या तरुणीने डोंबिवलीतील शिवसेना मध्यवर्ती शाखा गाठली.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी तातडीने शिवसेना महिला आघाडीला मदतीसाठी सूचना दिल्या. उपजिल्हा संघटक किरण मोंडकर, केतकी पवार, पल्लवी इंदुलकर आणि ललिता मेहर या महिला पदाधिकाऱ्यांनी पीडितेला धीर देत मानपाडा पोलीस स्टेशन गाठले. मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपत फडोल यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत विशेष पथक तैनात केले. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या एका तासात आरोपी क्रिश भोईर याला ताब्यात घेतले.

तपासात मोठी माहिती मिळण्याची शक्यता

या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस अधिकारी प्रियंका सादळकर करत आहेत. आरोपी क्रिश भोईर हा सराईत असण्याची शक्यता असून, त्याने अशाच प्रकारे इतरही मुलींना आपल्या जाळ्यात ओढले आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून नराधमाला कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Mumbai Watermelon Death : बिर्याणी त्यावर कलिंगड खाल्ल्यामुळे माणसाचा मृत्यू होऊ शकतो का? डॉक्टर काय म्हणतात?
  • एप्रिल महिन्यामध्ये ‘या’ राशींचे नशीब चमकणार….यामध्ये तुमची रास आहे का?
  • 2 तास 7 मिनिटांचा तो नवा सिनेमा… ‘धुरंधर २’चा मोडला रेकॉर्ड, अवघ्या 4 दिवसांत कमावले 2080 कोटी!
  • बुध-गुरु केंद्र योग: ‘या’ 6 राशींच्या नशिबात आता धनवर्षाव, उत्पन्नात होणार मोठी वाढ
  • रशियाकडून भारताला अत्यंत मोठे गिफ्ट, पुन्हा एकदा निभावली भारतासोबतची मैत्री, थेट दिले…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in