• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पठ्ठ्या फिरायला गेला अन् जीप लाईनवर अडकला, 3500 फूट खोल दरीत…धक्कादायक घटनेची महाराष्ट्रात चर्चा!

July 30, 2026 by admin Leave a Comment


Nandurbar Zipline Accident : पावसाच्या सरी बरसल्या की लोक फिरायला घराबाहेर पडतात. काही जण गड, किल्ल्यांवर रोमहर्षक चढाई करतात. तर काही जणांना नव्याने फुललेले दबधबे, नद्या पाहायला आवडतं. पावसाळ्यात डोंगरमाळ फुलून निघतो. डोंगर हिरवाईने नटतात. त्यामुळे काही तरुण-तरुणी ट्रेकिंगही करण्यासाठी घराबाहेर पडतात. परंतु फिरायला जाण्याची हीच हौस कधीकधी जीवघेणी ठरू शकते. साहसी पर्यटन करताना पाय घसरून, तोल गेल्याने किंवा अन्य कारणामुळे आतापर्यंत अनेकांचे जीव गेलेल आहेत. दरम्यान, नंदूरबार जिल्ह्यात असाच काहीसा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक तरुण जीप लाईनवर साहसी पर्यटन करत होता. परंतु तब्बल साडे तीन हजार फूट खोल दरीत तो अडकून पडला. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. सुदैवाने त्याच्यासोबत कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही. त्याला मोठ्या मेहनतीनंतर रेस्क्यू करण्यात आलं. या तरुणासाठी राबवण्यात आलेल्या रेस्कूय ऑपरेशनचीही तेवढीच चर्चा होत आहे.

नेमकं काय घडलं?

नंदूरबार जिल्ह्यात असलेले तोरणमाळ हे ठिकाण ओळखले जाते. पाऊस आला की या ठिकाणाला भेट देणाऱ्यांची संख्या वाढते. अनेक तरुण, तरुणी येथे फिरायला येतात. पर्यटनस्थळ असल्याने येथे वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. पर्यटनस्थळ म्हणून विकास झाल्याने येथे काही लोकांना रोजगाराचीही संधी उपलब्ध झालेली आहे. दरम्यान, याच थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या सीताखाई पॉईंटर असलेल्या झिप लाइनवर अजब प्रकार घडला. झीप लाईनवर साहसी पर्यटन करण्यासाठी गेलेला तरुण अडकून पडला. त्याला रेस्कूय करण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागली.

तांत्रिक बिघाड झाला आणि तो….

झीप लाईनवर अडकलेल्या पर्यटकाची सुखरूप सुटका करण्यात आली. तोरणमाळच्या सिताखाई पॉईंटवर असलेल्या 3 हजार 500 फूट खोल दरीवर साहसी खेळासाठी नव्याने झिप लाईन सुरू करण्यात आली आहे. एक पर्यटक या झीप लाईनचा अनुभव घेत होता. तो झीप लाईनवर असताना अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि तो दरीच्या मध्यभागीच अडकला. ही बाब लक्षात येताच परिसरात काही काळ मोठा थरार आणि घबराट पसरली होती. मात्र, घटनेचे गांभीर्य ओळखून झिप लाईनच्या सतर्क कर्मचाऱ्यांनी तत्परतेने मदतकार्य सुरू केले. अतिशय कौशल्याने रेस्क्यू ऑपरेशन राबवून या पर्यटकाला सुखरूप बाहेर काढण्यात कर्मचाऱ्यांना यश आले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मित्र किंवा नातेवाईकाचा ‘लोन गॅरेंटर’ बनताय? आधी वाचा ‘हे’ नियम, नाहीतर बसेल मोठा आर्थिक फटका
  • तिरंग्याच्या रंगातील गाऊनने उर्वशी रौतेला ट्रोल; कायदा नेमका काय सांगतो?
  • रेल्वेतून ब्लँकेट्स, चादरी चोरली? मग दंडासह इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास
  • कचोरीत उंदराच्या लेंड्या ? छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये भवानी स्वीटवर FDAची कारवाई
  • अनेक शेतकऱ्यांना माहिती नाही ट्रॅक्टरचे पुढचे टायर छोटे आणि मागचे टायर मोठे का असतात? कारण आहे खास

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in