• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नेपाळमध्ये हिंसेचा आगडोंब, कावड यात्रेवर हल्ला, सहा शहरात कर्फ्यु, तीन जण ठार, अनेक जखमी

July 30, 2026 by admin Leave a Comment


आपले शेजारील राष्ट्र असलेल्या नेपाळ येथे धार्मिक संघर्षात सहाहून अधिक शहरात कर्फ्यू लागला असून या दंगलसदृश्य परिस्थिती तीन जणांचा मृत्यू झाला आहे. कावड यात्रे दरम्यान हा धार्मिक संघर्ष उफाळून वर आलेला आहे. गेल्या चार दिवसात नेपाळच्या वेगवेगळ्या भागात हिंसा, आगी लावणे, तोडफोड, दगडफेक आणि पोलिसांशी चकमकीच्या अनेक घटना घडल्याने नेपळाची परिस्थिची चिंताजनक बनली आहे. संघर्ष मिठवण्यासाठी लष्कराने संवेदनशील भागाची टेहळणी करण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली आहे.

नेपाळमध्ये कावड यात्रेदरम्यान दोन धार्मिक गटात संघर्ष सुरु झाला आहे. या संघर्षात तीन जणांचा मृ्त्यू झाला असून डझनावारी लोक विविध घटनेत जखमी झाले आहेत. जखमींमध्ये निदर्शक, स्थानिक नागरिक आणि सुरक्षारक्षकांचा देखील समावेश आहे. अनेक ठिकाणी तर सरकारी आणि खाजगी संपत्तीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक वाहनांना आणि दुकानांना आगी लावण्यात आल्या आहेत.

या संघर्षानंतर नेपाळचे राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल सुनसरी जिल्ह्यासह आजुबाजुच्या क्षेत्रात सामाजिक सौहार्द बिघडल्याच्या घटनांवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. गेल्या अनेक शतकांपासून सामाजिक, धार्मिक आणि जातीय सौहार्द, सहिष्णुता, परस्पंर मेळजोळ आणि बंधुभाव आणि राष्ट्रीय एकता कायम ठेवण्याचे आवाहनही देखील राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांनी केले आहे.

प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, देवांगंजमधील बोलबम यात्रेदरम्यान हिंदू भाविक आणि स्थानिक मुस्लिम समाजातील काही लोकांमध्ये वाद झाला होता.त्यानंतर हा संघर्ष वाढत जाऊन दंगली सुरु झाल्या आहेत.

नेमका वाद कशामुळे झाला ?

मंदिराच्या सार्वजनिक जागेवर मोहरमच्या वेळी लावलेला झेंडा हटवण्याच्या वरुन येथे आधी पासून वाद निर्माण झाला होता. अनेकदा विरोध करुनही हा झेंडा न हटवल्याने या मुद्द्यांवर दोन्ही समाजाचे गट एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्यानंतर रविवारी रात्री कावड यात्रा ( बोलबम ) येथे त्याच मैदानावरुन जात असताना अचानक कावड यात्रेकरुंवर हल्ला झाल्याचे म्हटले जात आहे. वाद वाढत जाऊन हिंसा वाढत गेली. दगड फेकीच्या घटना पाहून पोलिसांनी गर्दीला नियंत्रित करण्यासाठी बळाचा वापर केला.

इंटरनेट सेवा संपूर्णपणे बंद

सुनसरीमध्ये सुरु झालेला हा धार्मिक संघर्ष हळूहळू अनेक नेपाळी शहरांमध्ये पसरला. आणि विविध ठिकाणी धार्मिक तणावाने उग्र रुप धारणे केले. त्यानंतर प्रशासनाने एकामागोमाग कठोर पावले उचलणे सुरु केले. अनेक शहरातील इंटरनेट सेवा संपूर्णपणे बंद करण्यात आली आहे. सुरक्षा दलाच्या अनेक तुकड्या तैनात केल्या आहेत. आणि लोकांना घराबाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्थिती हाताबाहेर गेल्याने इनरवा, जनकपुर, सिरहा, गोलबाजार, लहानसह अनेक शहरात कर्फ्यू लावण्यात आला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मित्र किंवा नातेवाईकाचा ‘लोन गॅरेंटर’ बनताय? आधी वाचा ‘हे’ नियम, नाहीतर बसेल मोठा आर्थिक फटका
  • तिरंग्याच्या रंगातील गाऊनने उर्वशी रौतेला ट्रोल; कायदा नेमका काय सांगतो?
  • रेल्वेतून ब्लँकेट्स, चादरी चोरली? मग दंडासह इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास
  • कचोरीत उंदराच्या लेंड्या ? छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये भवानी स्वीटवर FDAची कारवाई
  • अनेक शेतकऱ्यांना माहिती नाही ट्रॅक्टरचे पुढचे टायर छोटे आणि मागचे टायर मोठे का असतात? कारण आहे खास

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in