• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नुसतं भांडायची, सतत फोन बिजी, केतन अग्रवालला आली होती शंका, वडिलांना सांगितलं पण…नव्या माहितीने खळबळ!

June 30, 2026 by admin Leave a Comment


Ketan Agarwal Murder Case : पुण्यातील रियल इस्टेट व्यापारी केतन अग्रवालचा पुण्यातील लोहगड किल्ल्यावर खून करण्यात आला. होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांनी मिळून केतनला संपवल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. हे प्रकरण आता देशभरात गाजले आहे. कोट्यधीश असलेल्या केतनला होणाऱ्या पत्नीनेच मारल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय. चेतनवर प्रेम असल्याने आरोपी सिया गोयल हिला केतनसोबत लग्न करायचे नव्हते. दरम्यान, आता याच हत्याकांडात धक्कादायक माहिती समोर आल आहे. सियाच्या चेतनसोबतच्या अफेअरबाबत केतनला अगोदरच शंका आली होती, असे आता समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सिया अन्य मुलासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची शंका केतनला अगोदरच आली होती. हीच शंका त्याने आपल्या वडिलांकडे बोलून दाखवली होती. परंतु तू जसे समजतो आहेस तसे काही नाही. जास्त चिंतेची बाब नाही, असे केतनच्या पालकांनी त्याला सांगितले होते. लग्नाआधी सियाचा पूर्ण इतिहास जाणून घ्या. लग्नानंतर अडचण नको, असेही केतनने आपल्या पालकांना सांगितले होते.

केतनचा खून केल्याच्या आरोपाप्रकरणी सिया आणि चेतन यांना 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुलाची हत्या केल्याप्रकरणी केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी पोलिसात तक्रार दिलेल आहे. या तक्रारीनुसार केतनने अनेक वेळा सिया आणि चेतनच्या जवळीकीबाबत बोलून दाखवले होते. सिया नेहमी चेतनचे नाव घेते. मी अनेकदा फोन केला तरी तिचा फोन बिजी येतो, असेही केतने आपल्या वडिलांना सांगितले होते.

दरम्यान, केतन आणि सिया 6 जून रोजी बाली येथे फिरायला जाणार होते. परंतु काहीतरी कारण सांगून सियाने केतनसोबत जाणे टाळले होते. त्यामुळेही केतनला शंका आली होती. सिया छोट्या-छोट्या कारणांवरून भांडते, असेही केतनने आपल्या वडिलांना सांगितले होते. परंतु सियाचे वय कमी आहे. त्यामुळेच कदाचित ती तसं वागत असावी, असे म्हणून केतनच्या वडिलांनी त्याची समजूत काढली होती. दरम्यान, एका मध्यस्थाच्या मार्फत सिया आणि केतनचे लग्न जमले होते. परंतु सियाने आपल्या प्रियकाराला सोबत घेऊन त्याचा काटा काढला.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • स्वतःची कबर खणायला…, बॉलिवूड सोडून मौलानाशी लग्न केलेल्या सना खानची हैराण करणारी पोस्ट
  • ट्रेनमध्ये सोबत नेला तुपाचा डब्बा, तर सामान जप्त होणार… रेल्वेचा नियम वाचला का?
  • प्रथिने हवेत! शाकाहारी लोकांसाठी 5 सुपरफूड्स ठरतील मोठं वरदान, पदार्थांबद्दल जाणून घ्या महत्त्वाची माहिती…
  • PM नरेंद्र मोदी यांनी सेवातीर्थ येथे घेतली सचिवांची बैठक, आत्मनिर्भर भारताला गती देण्याचे दिले आदेश
  • ENG vs IND : टीम इंडिया इंग्लंड विरूद्धच्या आव्हानासाठी सज्ज, पहिला सामना किती वाजता?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in