• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ना ब्यूटी पार्लर, ना कोणतीही क्रीम, मधुबाला इतक्या सुंदर कशा दिसायच्या? रोज झोपण्यापूर्वी करायच्या ही गोष्ट

July 26, 2026 by admin Leave a Comment


भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक म्हणून आजही मधुबालाचे नाव आदराने घेतले जाते. त्यांच्या अभिनयाइतकीच त्यांच्या मोहक सौंदर्याचीही चर्चा नेहमी होत होती. अनेक दशकांनंतरही त्यांच्या सौंदर्याचे रहस्य जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये कायम आहे. विशेष म्हणजे, त्या काळात ब्युटी पार्लरमध्ये जाऊन सजणे हा प्रतिष्ठेचा भाग मानला जात असतानाही मधुबालांनी नैसर्गिक आणि घरगुती उपायांवरच विश्वास ठेवला.

मधुबालांचा स्किनकेअर रूटीन अत्यंत साधा होता. त्या रोज सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवायच्या आणि त्यानंतर त्वचेला मॉइश्चर मिळावे म्हणून क्रीम लावायच्या. त्वचेची नियमित स्वच्छता आणि योग्य काळजी हेच सुंदर त्वचेचे रहस्य असल्याचा त्यांचा विश्वास होता.

घरच्या घरी तयार करायच्या फेस पॅक

आठवड्यातून दोन वेळा त्या बेसन आणि मुलतानी मातीचा फेस पॅक लावत असत. मुलतानी माती त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेते, त्वचेची छिद्रे स्वच्छ ठेवते आणि त्वचा टवटवीत बनवते. तर बेसन मृत त्वचा, टॅनिंग आणि घाण दूर करून त्वचेला नैसर्गिक उजळपणा देते. या दोन्हींच्या मिश्रणामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते तसेच मुरुम आणि त्वचेच्या इतर समस्या कमी होण्यास मदत होते.

रात्री झोपण्यापूर्वी कच्च्या दुधाचा वापर

मधुबालांच्या स्किनकेअरमधील आणखी एक महत्त्वाची सवय म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी कच्चे दूध लावणे. त्या अर्धा कप कच्चे दूध घेऊन कापसाच्या साहाय्याने ते संपूर्ण चेहऱ्यावर लावत असत. दूध सुकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून मगच झोपत असत.

कच्चे दूध त्वचेसाठी नैसर्गिक क्लिन्झर म्हणून काम करते. त्यामुळे चेहऱ्यावरील धूळ, घाण आणि अतिरिक्त तेल साफ होण्यास मदत होते. तसेच त्वचा मऊ, मुलायम आणि तजेलदार राहण्यासही मदत मिळते.

हेल्दी आहारवर भर

मधुबालांचा विश्वास होता की सुंदर त्वचेसाठी बाह्य सौंदर्यप्रसाधनांपेक्षा निरोगी जीवनशैली अधिक महत्त्वाची असते. त्या संतुलित आणि पौष्टिक आहार घेत असत, वेळेवर झोपत आणि शरीराची योग्य काळजी घेत असत. त्यांना नैसर्गिक सौंदर्य जपणे अधिक आवडत असे. त्यामुळे त्यांच्या बहुतांश चित्रपटांमध्येही त्या अत्यंत हलक्या मेकअपमध्ये दिसायच्या.

टीप: वरील उपाय हे पारंपरिक घरगुती पद्धतींवर आधारित आहेत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. त्यामुळे कोणताही नवीन उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करावी किंवा त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in