
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील मातोश्री येथे नाशिकमधील नगरसेवकांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत नाशिकमधील सर्व 15 नगरसेवक उपस्थित होते.
बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांशी सविस्तर चर्चा केली. पक्षाविरोधात सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नगरसेवकांची भूमिका जाणून घेतली. तसेच आगामी राजकीय परिस्थितीवरही विचारविनिमय करण्यात आला.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांना, “तुम्ही कोणत्याही दबावाला किंवा आमिषाला बळी पडणार नाही, याचा मला कायम विश्वास आहे,” असे सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
नगरसेवकांनी देखील पक्षासोबत कायम राहण्याची भूमिका स्पष्ट केली. काही खासदारांनी पक्ष सोडला असला तरी नाशिकचे नेते आणि पदाधिकारी पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकच्या खासदारांनी पक्ष निष्ठा काय असतं ते सिद्ध केलं मात्र त्यंच्या सोबतच्या खसादारांनी बंडखोरी केली, तुम्हीही तुमच्या सहकाऱ्यांशी सुसंवाद ठेवा, तमच्यावर मला हाच विश्वास आहे. दरम्यान, नाशिकमधील सर्व नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच पुढे काम करणार असल्याचे स्पष्ट झाल्याने राजकीय चर्चांना नवीन दिशा मिळाली आहे.
Leave a Reply