• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नागपुरात ‘सैराट’चा थरार! मुलीच्या प्रेमसंबंधामुळे तडीपार बापाचं डोकं फिरलं, तरुणाला धारदार शस्त्राने वार करून संपवल्याचा आरोप

July 25, 2026 by admin Leave a Comment


नागपुरात काही आठवड्यांपूर्वी महिलेने एक लाखाची सुपारी देऊन नवऱ्याची हत्या घडवून आणल्याची घटना ताजी असताना आणखी एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. नागपूरच्या कामठीतील कुंभारे कॉलनीत प्रेमसंबंधाच्या वादातून एकाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. तडीपार असलेल्या इसमाने मुलीच्या मित्रावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यानंतर या जीवघेण्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने कामठी परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या कामठीतील कुंभारे कॉलनी परिसरात प्रेमसंबंधाच्या वादातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जमशेर उर्फ जम्मु मुनीर खान पटेल असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. जमशेर हा 18 जुलै रोजी रात्री मैत्रिणीला भेटण्यासाठी गेला. त्यावेळी तरुणीचे वडील विजय उर्फ टायसन नामदेव डोंगरे याने धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप आहे.

हत्या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चर्चा करावी, पीडित कुटुंबाची मागणी 

विजयने हल्ला केल्यानंतर जखमी जमशेर जीव वाचवण्यासाठी पळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याचा पाठलाग करून रिक्षाने धडक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. जमशेरवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. मुख्य आरोपी विजय डोंगरे हा तडीपार असतानाही शहरात मुक्तपणे वावरत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकारानंतर नागरिकांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. आरोपीला तातडीने अटक करून कठोर शिक्षा करावी आणि संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी करावी, अशी मागणी मृत तरुणाच्या कुटुंबांनी केली आहे.

नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

नागपूरच्या कामठी परिसरात हत्येची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. तरुणाच्या हत्येने सर्वसामान्यांकडून सुरक्षेची मागणी केली जात आहे. तर वाढत्या गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत, असंही नागरिकांनी म्हटलं आहे. तसेच जमशेऱ हत्या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी देखील कामठीतील नागरिकांकडून केली जात आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in