• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नशीब फुटकंच, शतकी खेळीचा जयस्वालला काहीच फायदा नाही; गिलने मॅच जिंकल्यानंतर सगळं सांगून टाकलं

June 21, 2026 by admin Leave a Comment


भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिका आता संपली. भारताने अफगाणिस्तानला तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 3-0 ने पराभूत करत व्हाईट वॉश दिला. अंतिम सामन्यात भारतीय संघाने 9 विकेट्सने जिंकला. सामन्यात यशस्वी जयस्वालने शानदार शतक झळकावले. जयस्वालला जेव्हा संधी मिळते तेव्हा तो शतके झळकावतो, पण तरीही त्याला भारतीय संघातून वगळले जाते. या मालिकेतही सुरुवातीला त्याचे नाव नव्हते पण नंतर मात्र विराट कोहलीच्या दुखापतीमुळे त्याला संघात स्थान मिळाले. आता हे स्थान संघात पक्के राहणार की विराट आल्यानंतर यशस्वीला पुन्हा वगळण्यात येणार याबद्दल कर्णधार शुभमन गिलने एक मोठे विधान केले आहे.

यशस्वी जयस्वालने आपले पहिले एकदिवसीय शतक शेवटचे 2025 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 116 धावांची नाबाद खेळी करून झळकावले होते. त्यानंतर तो भारतीय एकदिवसीय संघाबाहेर राहिला, पण आता संधी मिळताच त्याने पुन्हा शतक झळकावले आहे. भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने आता म्हटले आहे की, “जयस्वालसारखा खेळाडू संघाबाहेर राहणे हे आमच्यासाठी दुर्दैवी आहे. कोणत्याही खेळाडूसाठी हे सोपे नसते. जेव्हा सर्व खेळाडू उपलब्ध असतात, तेव्हा त्याला बाहेर बसावे लागते. या मालिकेत विराट भाई उपलब्ध नव्हता आणि त्यामुळेच त्याला खेळण्याची संधी मिळाली. तो आज खूप चांगला खेळला आणि आशा आहे की तो हाच फॉर्म कायम ठेवेल आणि भविष्यात मिळणाऱ्या संधींचा फायदा घेईल.”

यशस्वी जयस्वालने 6 फेब्रुवारी 2025 रोजी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून त्याने भारतीय संघासाठी एकूण सहा एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये दोन शतकांचा समावेश असून, जयस्वालने 71.25 च्या सरासरीने 285 धावा केल्या आहेत. भारतीय संघ आता जुलैमध्ये इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे, ज्यात विराट कोहलीचे पुनरागमन होईल. जयस्वाल भारतीय संघाच्या एकदिवसीय अंतिम 11 खेळाडूंमध्ये आपले स्थान निश्चित करू शकतो की नाही, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना 14 जुलै रोजी खेळला जाईल आणि भारतीय संघाची घोषणा येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बॉबी देओलसोबत मराठमोळ्या अभिनेत्रीचे इंटिमेट सीन्स; म्हणाली ‘शूट करताना मर्यादा..’
  • जरांगे, हाकेंना आंदोलनाआधीच मोठा झटका? गृहविभागाचे तातडीचे आदेश; आता आझाद मैदानात…
  • तुमच्या फोन आणि सिम कार्डमध्ये सोने असते! ते काढून पैसे कमावता येतात का?
  • सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी
  • Tukaram Mundhe: मुंढे इफेक्ट, दादरच्या प्रसिद्ध वडापाव विक्रेत्याचे धाबे दणाणले, लगेच केला बदल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in