
श्रीलंकन संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. ही मालिका 15 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या टी20 मालिकेपूर्वी श्रीलंकेवर कर्णधार बदलण्याची वेळ आली आहे. कुसल मेंडिस या मालिकेतून बाद झाला आहे. त्याची जागा चरिथ असालंकाने घेतली आहे. (Photo: PTI)
कुसल मेंडिसला लंका प्रीमियर लीग स्पर्धेदरम्यान दुखापत झाली होती. त्याची हॅमस्ट्रिंग दुखापत अजूनही बरी झालेली नाही. त्यामुळेच भारताविरुद्ध कसोटी मालिकेतही खेळला नव्हता. (Photo: PTI)
चरिथ असालंकाकडे पुन्हा एकदा श्रीलंकन संघाचं कर्णधारपद सोपवलं आहे. मागच्या वर्षी त्याच्याकडेच संघाची धुरा होती. श्रीलंकेने मागच्या पाच वर्षात सात खेळाडूंना कर्णधारपदाची धुरा सोपवली होती. (Photo: PTI)
2021 मध्ये अँजेलो मॅथ्यूजकडे संघाची धुरा होती. त्यानंतर कुसल परेरा आणि नंतर दासुन शनाका यांना कर्णधार सोपवलं. सहान अराचिगेने कर्णधारपद भूषवलं होतं. त्यानंतर ही सूत्र वानिंदु हसारंगा, चरिथ असालंका यांच्याकडे सोपवली. मग दासुन शनाकाला कर्णधार बनवलं. आता कुसल मेंडिसकडे जबाबदारी सोपवली आहे. (Photo: PTI)
इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत वेगवान गोलंदाज बिनुरा फर्नांडो खेळणार नाही. त्याला दुखापत झाली असून टी20 मालिकेतून बाहेर झाला आहे. (Photo: PTI)




Leave a Reply