• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नवं फिचर्स अंगाशी आलं, तीन दिवसाची डेडलाईन, तडकाफडकी नोटीसने व्हॉट्सअपचे धाबे दणाणले

July 1, 2026 by admin Leave a Comment


व्हॉट्सअ‍ॅपकडून नव्या यूजरनेम फिचरची घोषणा करण्यात आली आहे. या नव्या यूजरनेम फिचरमुळे युजरची प्रायव्हसी आणखी जपली जाईल असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. मात्र भारत सरकारने या नव्या फिचवर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. या पार्श्वभूमीवर आता भारत सरकारने व्हॉट्सअ‍ॅपची पॅरंट कंपनी असलेल्या मेटाला मोठा दणका दिला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या नव्या यूजरनेम फिचरच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून मेटाला नोटीस बजावण्यात आली आहे. ‘युझरनेम’ फिचरबाबत तीन दिवसांच्या आत कंपनीने सविस्तर स्पष्टीकरण द्यावे, असे निर्देश या नोटीसद्वारे सरकारने मेटाला दिले आहेत. तसेच या नव्या फिचरवर चर्चा पूर्ण होईलपर्यंत भारतात व्हॉट्सअ‍ॅपसाठी हे नवं फिच सुरू करू नये, असे आदेश देखील सरकारने दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

सरकारने का उचललं पाऊल?

भारतात आधीच डिजिटल फ्रॉडच्या प्रकरणामध्ये मोठी वाढ झाली आहे, कधी बँक अधिकारी बनून तर कधी पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करत ऑनलाईन ठग सामान्य नागरिकांच्या बँक अकाऊंटवर डल्ला मारत आहेत. कधी कधी लोकांना एखाद्या चुकीच्या स्किममध्ये पैसे गुंतवण्यास सांगून फसवणूक केली जात आहे. हे सर्व रोखण्यासाठी सरकारकडून कठोर पाऊलं उचलली जात आहेत. मात्र त्यातच जर आता व्हॉट्सअ‍ॅप नव्या फिचर्सनुसार जर संबंधित व्यक्तीच्या नंबर ऐवजी फक्त नावानेच व्हॉट्सअ‍ॅपचं अकाऊंट सुरू झालं तर सायबर ठग कोणाचंही नाव वापरून एखाद्याची सहज फसवणूक करू शकतील, त्यामुळे आता सरकारने व्हॉट्सअ‍ॅपच्या या नव्या फिचर्स संदर्भात मेटाला नोटीस पाठवली असल्याची माहिती समोर येत आहे. जोपर्यंत चर्चा पूर्ण होत नाही, तोपर्यंत हे नवं फिचर सुरू करू नये असे आदेश देखील सरकारने मेटाला दिले आहेत.

फसवणूक कशी होऊ शकते?

हे नवं फिचर सुरू झाल्यास सायबर ठग हे एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या नावाचा वापर करून बनावट यूजरनेम बनवू शकतात. त्या प्रसिद्ध व्यक्तीच्या नावाच्या एखाद्या अक्षरात थोडासा बदल करून हे सहज शक्य होईल, आणि ही गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या लवकर लक्षात सुद्धा येणार नाही, त्यामुळे फसवणुकीचे प्रकार देखील वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आता सरकारकडून मेटाला नोटीस पाठवण्यात आली आहे, दरम्यान या नोटीसीला मेटा काय उत्तर देणार, सरकारच्या भूमिकेनंतर हे फिचर व्हॉट्सअ‍ॅप भारतात सुरू करणार की नाही? आणि समजा सुरू केलंच तर भारत सरकार त्याविरोधात काय निर्णय घेणार? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Amravati Hospital Fire : दोषींची गय केली जाणार नाही, रुग्णालयातील आगीची सखोल चौकशी होणार – आरोग्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा
  • Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ… भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क…
  • Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची दूध भेसळीवर नजर; तुमचं दूध Pure आहे की भेसळयुक्त? असं ओळखा
  • रोहित शर्मा ही तुमच्या क्रिकेट टीममध्ये! गेमिंगच्या दुनियेत एंट्री, eCricket गेम गाजवणार
  • मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in