• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

धोक्याची घंटा वाजली नी पंतप्रधानांनी सूत्र फिरवली, प्रधान यांच्या राजीनाम्याची ती Inside Story, तुम्ही वाचली?

July 26, 2026 by admin Leave a Comment


Dharmendra Pradhan Resign: ज्याची शक्यताच नाकारली जात होती, तेच मोदी सरकारच्या इतिहासात पहिल्यांदा घडले. या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. ही तर सुरुवात आहे, अजून पिक्चर बाकी आहे, अशी लागलीच प्रतिक्रिया CJP चा संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी दिली. पण असे 24 तासात काय घडले की प्रधानांचा डाव संपला यावरून खल सुरू आहे. प्रधानांच्या राजीनाम्यापूर्वी सरकारने CJP सोबत बोलणीची फेरी सुरू केली. तात्काळ NTA राष्ट्रीय परीक्षा एजन्सीतील 47 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले. आंदोलकांच्या तीन मागण्या पूर्ण केल्या. पण प्रधानांचा राजीनाम्याशिवाय वातावरण निवळणार नाही याचा अंदाज सरकारला आला आणि पुढे जो घडले, त्याचा देश साक्षीदार झाला.

सरकारची कडक भूमिका

शुक्रवारी सकाळपर्यंत प्रधानांचा राजीनामा होणार नाही, अशी केंद्राची भूमिका होती. सरकार आंदोलन निवळण्यासाठी प्रयत्नात होते. अगोदर उच्च शिक्षण सचिवांना पदावरून हटवण्यात आले. नंतर NTA राष्ट्रीय परीक्षा एजन्सीतील 47 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले. पेपरफुटीतील दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षेचे, फास्ट ट्रॅक कोर्टातील खटल्याचे आणि आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना भरपाईचे आश्वासन देण्यात आले. पण कॉक्रोच जनता पार्टी प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम होती. त्यातच आंदोलनाचे लोण देशभरात पोहचले होते. मुंबई, पुणे, नागपूर, पाटणा ते इंफाळपर्यंत, दक्षिणेपर्यंत उत्तर भारतातही विद्यार्थी, तरुणाई रस्त्यावर उतरली. दुपारनंतर चित्र पालटले. राजीनाम्यासंदर्भात मंथन सुरू झाले. सरकार कोणताही धोका पत्करण्याच्या मनस्थिती नसल्याचे समोर आले.

परिस्थितीवर अमित शाह यांची नजर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची देशातील आंदोलनं, तिथली हिंसा, पोलिसांसोबतच्या घटना, जाळपोळ, दगडफेक याचं इनपूट आलेले होते. पंतप्रधानांनी दोन दिवसांपासून मोर्चा सांभाळला. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणाईशी संवाद साधला. त्यांना योग्य कारवाईचे आश्वासन दिले. पण दुपारपर्यंत सरकारच्या लक्षात आले की, प्रशासकीय निर्णयावर आता भागणार नाही. आता ठोस कारवाई करणे गरजेचे आहे. आंदोलनाच्या आडून काही लोक फायदा उचलत असल्याचा आणि मोठं काहीतरी करणार असल्याचे इनपूट समोर येत होती.

मोदींनी सूत्र घेतली हाती

शुक्रवारी रात्रीपासून ते शनिवारी सकाळपर्यंत घडामोडींना वेग आला. जंतरमंतरवर दगडफेक झाली. तर बिहारमध्ये हिंसाचार उफाळला. देशातील अनेक शहरात तरुणाई रस्त्यावर आली. सरकारविरोधातील वातावरण तापले. गोपनिय माहिती समोर येऊ लागली. प्रशासनाकडून इनपूट वाढले. पीएमओ ऑफिसपर्यंत या घडामोडी आल्या. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची स्थिती लक्षात आणून देण्यात आली. हे इनपूट समोर येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूत्र हाती घेतली. पुढे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून दिली.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • विवो कंपनीच्या ‘या’ स्मार्टफोन मॉडेल्सच्या वाढल्या किमती, जाणून घ्या
  • फरशी चमकण्यासोबत घरात दरवळेल सुगंध, स्वयंपाकघरात ठेवलेल्या या गोष्टींपासून बनवा क्लिनर
  • IND vs SL : कोलंबोत टीम इंडियाचा विजय नक्की! फॉलोऑननंतर श्रीलंकेचा असा आहे रेकॉर्ड
  • आधी भाजपासाठी तयारी, आता शिंदे गटाच्या वाटेवर, धाराशिवच्या त्या 5 नगरसेवकांची राज्यात चर्चा
  • प्रसाद लाड पुन्हा मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in