• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘धुरंधर’ फेम गायिकेचा लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान साखरपुडा; कोण आहे मिस्ट्री मॅन?

July 12, 2026 by admin Leave a Comment


‘धुरंधर’ फेम गायिका जास्मिन सँडलसने तिच्या चाहत्यांना एक अनपेक्षित सुखद धक्का दिला आहे. दिल्लीतील ‘द ड्रीम गर्ल इंडिया टूर’च्या भव्य उद्घाटनप्रसंगी जास्मिनने अचानक मंचावर तिच्या खासगी आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीशी सर्वांची ओळख करून दिली. ही व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून जास्मिनचा होणारा पती आहे. लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान जास्मिनने तिचा होणारा पती शेखर चौधरीला मंचावर बोलावलं. या दोघांना एकत्र पाहताच उपस्थितांनी टाळ्या कडकडाट केला आणि शिट्ट्या वाजवल्या. त्याचवेळी तिने तिच्या साखरपुड्याची अंगठी दाखवली.

शेखरला मंचावर बोलावून जास्मिन म्हणाली, “हे आहेत माझे चौधरी साहेब. मी त्याला इथं बोलावलं आहे. त्याने मला ही अंगठी दिली आहे.” हे बोलताना जास्मिनच्या आनंदाला पारावार उरत नाही. ती स्टेजवरच आनंदाने उड्या मारत शेखरला मिठी मारते. त्यानंतर दोघं एकत्र रोमँटिक डान्ससुद्धा करतात. जास्मिनचं ‘लावाँ’ हे गाणं वाजताच स्टेजवर दोघं रोमँटिक होऊन नाचू लागतात. या सुंदर क्षणांची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. जास्मिनचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

पहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Mayank raj (@oyem.annuu)

जास्मिन याआधी प्रसिद्ध पंजाबी गायक गॅरी संधूला डेट करत होती. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. या ब्रेकअपबद्दल ती अनेकदा मोकळेपणे व्यक्त झाली होती. ब्रेकअपनंतर माझ्या आयुष्याची दिशाच हरवली होती, असं तिने म्हटलं होतं. आता शेखरच्या रुपात तिच्या आयुष्यात पुन्हा प्रेम परतलं आहे. कॉन्सर्टमध्ये नंतर तिने तिची अनेक हिट गाणी गायली. ‘सिप सिप’, ‘लावाँ’, ‘शरारत’, ‘जाय्ये सजना’, ‘धुरंधर’, ‘तरस’, ‘यार ना मिले’ यांसारखी गाणी तिने दमदारपणे सादर केली.

विशेष म्हणजे या कॉन्सर्टमधील जास्मिनच्या लूकनेही सर्वांचं लक्ष वेधलं होतं. यावेळी तिने भरजरी सोनेरी लेहंगा परिधान केला होता आणि त्यावर साजेसे दागिने घातले होते. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. दिल्लीतून सुरू झालेला तिचा ‘ड्रीम गर्ल इंडिया टूर’ आता मुंबई, बंगळुरू आणि चंदीगड इथंही होणार आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Kiara Advani: टॅक्सिक फेम कियाराचा कातिल अंदाज, फोटो पाहून चुकेल काळजाचा ठोका
  • Mulshi Pattern 2: मुळशीची बदनामी करून मोठे झाले, पैसा कमावला..; प्रवीण तरडेंवर मुळशीकरांचा आरोप, ‘मुळशी पॅटर्न 2’च्या नावाला विरोध
  • Vastu Tips : घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावताय? या दिशेला बिलकूल लावू नका
  • पाकिस्तान महिला क्रिकेटची वेगवान गोलंदाज आयमन अन्वरची निवृत्ती, कारण की..
  • कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in