• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘धुरंधर’च्या यशानंतर जास्तच घमंडी झालाय जमील जमाली! प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणाला, ‘तेरी तो चाल ही बदल गई…’

April 25, 2026 by admin Leave a Comment


Dhurandhar: फक्त बॉलिवूड मध्येच नाही तर, सध्या एकाच सिनेमाची सर्वत्र चर्चा रंगली आहे आणि तो सिनेमा म्हणजे ‘धुरंधर’, दिग्दर्शक आदित्य धर यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा फक्त भारतातच नाही तर, जगभरात नवीन विक्रम रचताना दिसत आहे. ‘धुरंधर’ सिनेमाचा पहिला भाग 5 डिसेंबर 2025 मध्ये प्रदर्शित झाला, तर दुसरा भाग 19 मार्च 2026 रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शित झाल्यापासून धुरंधर सिनेमाचा सर्वत्र बोलबाला पाहायला मिळत आहे… ‘धुरंधर 2’ प्रदर्शित होऊन आता एक महिना उलटला आहे, पण तरी देखील चाहत्यांमध्ये सिनेमा आणि सिनेमातील डॉयलॉगची चर्चा रंगली आहे.

सिनेमात अभिनेता रणवीर सिंग याने महत्त्वाची भूमिका साकारत आपल्या अभिनयाने आणि हटके स्टाईलने सर्वांना अवाक् केलं आहे. विशेषतः अभिनेत्याचं ट्रांसफॉर्मेशन आणि हेअरस्टाईल सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे… पण सिनेमाचा खरा हिरो तर कोणी दुसराच ठरला…

‘धुरंधर’ सिनेमातील अशा एका अभिनेत्याने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं, जो गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. पण जशी इतर अभिनेत्यांना ओळख, प्रसिद्धी मिळाली, तशी या अभिनेत्याला ‘धुरंधर’ सिनेमानंतर मिळाली. सध्या ज्या अभिनेत्याची चर्चा रंगली आहे. तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर, राकेश बेदी आहे. विनोदाच्या अचूक टायमिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या राकेश बेदी यांनी या दोन्ही सिनेमामध्ये ‘जमील जमाली’ची अशी भूमिका साकारली आहे.

‘धुरंधर’ सिनेमाच्या दोन्ही भागात राकेश बेदी यांनी अशी भूमिका साकारली आहे, ज्यामुळे सिनेमातील लपलेला अभिनेता… असं अनेकांनी म्हटलं आहे. पण यासाठी राकेश बेदी यांना अनेक वर्ष वाट पाहावी लागली आहे… अशात ‘जमील जमाली’ ही भूमिका साकारण्याासाठी देखील त्यांनी मोठी मेहनत घेतली.

राकेश बेदी यांचं आता सर्वत्र कौतुक होत आहे. नुकताच प्रसिद्ध दिग्दर्शक डेविड धवन यांनी देखील राकेश बेदी यांचं कौतुक केलं आहे… ‘आम्ही एकत्र अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. माझ्या आगामी सिनेमात देखील राकेश बेदी झळकणार आहेत. मी त्याला विनोदी अंदाजात म्हणालो, 50 वर्षांपूर्वी तुला कोणी ओळखत नव्हतं… पण आता तुला खरी ओळख मिळाली आहे.’

‘राकेश बेदी कायम एक उत्तम अभिनेता राहिला आहे… आता सत्तरीत पोहोचल्यानंतर बॉलिवूडमध्ये त्याची ओळख भक्कम झाली आहे आणि या गोष्टी तो लायक आहे… मी त्याला म्हणजतो ‘तेरी तो चाल बदल गई यार…’ आता पाहिल्यानंतर आनंद होतो… अखेर ज्या गोष्टीसाठी तो पात्र होता ती गोष्ट त्याला मिळाली आहे.’ असं सुद्धा डेविड धवन म्हणाले.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अक्षय कुमारच्या लेकीचे नग्न फोटो मागणाऱ्या विरोधात कठोर कारवाई, पोलिसांकडून मोठी अपडेट समोर
  • RCB vs GT : गुजरातच्या या प्लेयरवर बसला विलनचा ठप्पा, त्याच्यामुळे पहिल्याच चेंडूवर RCB विरुद्ध हरली टीम
  • Devendra Fadnavis | मराठीच्या सक्तीवरून मनसे-शिंदे गटाची जुंपली, भैय्यांना हिसका; मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया काय?
  • Tv9 Marathi Special Report | मराठी सक्तीवरून वाद पेटला; अविनाश जाधव-सदावर्ते आमने-सामने, अमित ठाकरे यांचा इशारा काय?
  • भारताचा चीनला इतिहासातील सर्वात मोठा दणका, थेट वाढली चिंता, हिंद महासागरावर..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in