
मोठी बातमी समोर येत आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच राज्यासह देशाच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यानंतर आता त्यांचं पहिलं ट्विट समोर आलं आहे. देवेंद्र फडणवीस धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच तातडीने दिल्लीला रवाना झाल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे, या सर्व पार्श्वभूमीवर राज्यात फडणवीस यांच्या या दिल्ली दौऱ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. केंद्रात फडणवीस यांनी शिक्षण खांत मिळू शकतं असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच आता फडणवीस यांनी पहिलं ट्विट केलं आहे.
फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलं?
धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक महत्त्वाच्या सुधारणा केल्या, राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीत त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. परदेशात आयआयटीचा विस्तार, 19 भाषांमध्ये प्रवेश परीक्षेचा विस्तार यासंह त्यांनी अनेक सुधारणा त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये घडवून आणल्या. व्यापक सामाजिक हितासाठीची आपली वचनबद्धता दर्शवत, त्यांनी आज आपला राजीनामा सादर केला, संपूर्ण भाजप परिवार त्यांच्यासोबत आहे, असं ट्विट फडणवीस यांनी केलं आहे.
तीनही मागण्या मान्य
दरम्यान कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने सरकारकडे तीन प्रमुख मागण्या करण्यात आल्या होत्या, त्यातील पहिला आणि प्रमुख मागणी होती ती म्हणजे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, दुसरी मागणी म्हणजे आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार नाही, आणि तसरी मागणी ज्या विद्यार्थ्यांनी नीट परीक्ष प्रकरणात आत्महत्या केली आहे, त्यांच्या कुटुंबाला मदत, दरम्यान या तीनही मागण्या मान्य झाल्या असल्याची माहिती कॉकरोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.
Leave a Reply