• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच बॉलिवूड कलाकारांच्या निर्भिड प्रतिक्रिया; कोण काय काय म्हणालं?

July 25, 2026 by admin Leave a Comment


गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली सुरु असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश मिळालं आहे. देशभरात विद्यार्थी आंदोलन करत असतानाच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आल्यानंतर सोशल मीडियावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटू लागल्या. अनेक बॉलिवूड कलाकार आणि सेलिब्रिटींनीही या घडामोडींवर आपली मते व्यक्त केले आहे.

अभिनेत्री रिद्धी डोगरा हिने लोकशाही एका दिवसात निर्माण झालेली नसून नागरिकांच्या सातत्यपूर्ण सहभागातून ती मजबूत होत असल्याचे म्हटले. आजचा दिवस प्रत्येकाच्या आवाजात ताकद असल्याची जाणीव करून देतो. भारताचे भविष्य तरुणांच्या हातात आहे असे तिने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले. तसेच देशभक्ती म्हणजे देश आपल्यासाठी काय करतो यापेक्षा आपण देशासाठी काय करतो हे अधिक महत्त्वाचे असल्याचेही तिने सांगितले.

गायक अरमान मलिक याने युवकांची ताकद असा छोटा संदेश शेअर केला.

अभिनेता सनी हिंदुजा यानेही विद्यार्थ्यांचे कौतुक करत, एकत्र उभे राहिल्यास मोठा बदल घडवून आणता येतो. हा दिवस इतिहासात नोंदला जाईल अशी प्रतिक्रिया दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Hinduja (@hindujasunny)

अभिनेत्री राशी खन्ना हिने प्रत्येक लढा मथळा बनत नाही, पण सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा संघर्ष देशासमोर आला असे म्हटले. तर शिबानी अख्तर हिने आजच्या पिढीच्या जिद्दीचे आणि निर्धाराचे कौतुक करत आनंद व्यक्त केला.

अभिनेता अभिषेक बॅनर्जी याने डीपी बदलली… Gen Z चे अभिनंदन असे म्हणत एकजुटीचे महत्त्व अधोरेखित केले. कॉमेडियन पारितोष यांनी सकारात्मक विचारांचा सन्मान करण्याची गरज असल्याचे नमूद केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhishek Banerjee (@nowitsabhi)

दरम्यान, अभिनेता विजय वर्मा याने धर्मेंद्र प्रधान यांचा फोटो शेअर करत ‘अच्छा चलता हूँ… दुआओं में याद रखना’ असे कॅप्शन दिले. वीर दास याने प्रार्थना, भारतीय ध्वज आणि हृदयाचे इमोजी शेअर करून प्रतिक्रिया दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vijay Varma (@itsvijayvarma)

अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिनेही धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची माहिती आपल्या सोशल मीडिया स्टोरीवर शेअर केली. सध्या धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर या विषयावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली असून, विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून प्रतिक्रिया येत आहेत.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in