• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा नाही दिला तर… CJP चा प्लॅन बी काय? आशुतोष रांकाने भात्त्यातून काढला बाण

July 25, 2026 by admin Leave a Comment


CJP Protest Dharmendra Pradhan Resign: केंद्र सरकारसोबत काल कॉक्रोच जनता पार्टीच्या द्विसदस्यीय शिष्टमंडळाने चर्चा केली. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि मंत्री जितेंद्र सिंग यांच्यासोबत रांका आणि सौरभ दास यांनी चर्चा केली. आज पुन्हा बैठक होणार आहे. CJP चे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका म्हणाले की, नुकसान भरपाई आणि कायदेशीर प्रकरणात सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. पण केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर अद्याप कोणतेही ठोस आश्वासन देण्यात आलेले नाही. जर सरकारने प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठोस आश्वासन दिले नाही तर या बैठकांना काहीच अर्थ उरत नसल्याचे सणसणीत उत्तर रांका यांनी दिले. पक्ष पुढील रणनीतीवर काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भरपाई आणि कायदेशीर कारवाईबाबत सकारात्मक प्रतिसाद

आशुतोष रांकाने सांगितले की कालच्या बैठकीत सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी नुकसान भरपाई आणि कायदेशी कारवाईबाबत ठोस आश्वासन दिले. नीट प्रश्नपत्रिका फुटीनंतर काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या होत्या, त्यासंदर्भात हे आश्वासन देण्यात आले. सरकारने लेखी आश्वासन दिले आहे. अनेक मुद्यांवर सरकारचा सकारात्मक प्रतिसाद असल्याचे रांका यांनी स्पष्ट केले. आज चर्चेची दुसरी फेरी होईल. पण धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची CJP ची जी मुख्य मागणी आहे, ती अद्याप अपूर्ण असल्याचे रांका यांनी स्पष्ट केले.

सरकारला CJP चा कडक इशारा

CJP चे राष्ट्रीय प्रवक्ते रांका यांनी सरकारला कडक इशाराही दिला आहे. सरकारने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याविषयी वेळकाढूपणा केला तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. सरकार जर आमच्या मुख्य मागण्यांकडे कानाडोळ करेल तर मग संघटनेला आंदोलन तीव्र करण्याशिवाय पर्याय नसेल असे रांका यांनी बजावले.

47 NTA अधिकारी हटवले

सरकारने राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमधील NTA मधील 47 अधिकारी हटवले आहेत. त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आली आहे. सीजेपीच्या आंदोलनाचा हा मोठा परिणाम मानल्या जातो. त्यावरही आशुतोष रांका यांनी प्रतिक्रिया दिली. सरकारच्या कृतीचे त्यांनी कौतुक केले. पण मूळ प्रश्न यामुळे सुटलेला नसल्याचा दावा त्यांनी केला. या सर्व प्रकरणाची अंतिम जबाबदारी ही शिक्षणमंत्र्यांची आहे. कारण NEET प्रश्नपत्रिका फुटली आणि त्यानंतर देशात विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. त्याची थेट जबाबदारी ही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर कॉक्रोच जनता पार्टी ठाम असल्याचा संदेश त्यांनी दिला. जर सरकारने ऐकले नाही तर मग आंदोलन तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in