• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होताच सोमन वांगचुक यांचं मोठं विधान, हा तर… हॉस्पिटलमधूनच फोटो पोस्ट

July 25, 2026 by admin Leave a Comment


केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सोमन वांगचुक यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. वांगचुक यांनी म्हटले की, हा लोकशाहीचा मोठा विजय आहे. हा निर्णय शांततापूर्ण जनआंदोलन आणि देशभरातील तरुणांच्या संयमाचा परिणाम आहे. यासह सोनम वांगचुक यांनी हॉस्पिटसमधील एक फोटो शेअर केला आहे. यात त्यांनी विजयाचा सिम्बॉल दाखवला आहे.

हा लोकशाहीचा विजय…

सोनम वांगचुक एक्सवर लिहिले की, ‘हा लोकशाहीचा विजय आहे. हा थेट रस्त्यावरून उमटलेल्या प्रत्यक्ष लोकशाहीचा विजय आहे. हा शांतता, संयम आणि सातत्यपूर्ण संघर्षाचाही विजय आहे. लोकशाहीमध्ये जनतेचा आवाज सर्वांत महत्त्वाचा असतो आणि जेव्हा नागरिक शांततापूर्ण पद्धतीने आपली भूमिका मांडतात, तेव्हा त्याचा परिणाम दिसून येतो.’

आंदोलकांचे अभिनंदन

वांगचुक यांनी CJP आणि देशभरातील Gen Z विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना म्हटले की, ‘आंदोलकांनी सातत्याने आपल्या हक्कांसाठी आणि शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या मागणीसाठी ठामपणे आवाज उठवला.’ यासोबतच त्यांनी देशभरातील त्या नागरिकांचेही आभार मानले, ज्यांनी न घाबरता आंदोलनाला पाठिंबा दिला आणि आपला आवाज बुलंद केला.

वांगचुक यांची पोस्ट

IT’S A VICTORY OF DEMOCRACY
direct democracy… straight from the streets.
It’s a victory of peace, patience & persévérance.
Congratulations CJP, Gen Z of the nation and thank you all citizens for shedding fear and the fear of fear and rising up from every corner of the nation.… pic.twitter.com/rSLOfvba2R

— Sonam Wangchuk (@Wangchuk66) July 25, 2026

वांगचुक यांनी शेवटी लिहिले की, ‘आता केवळ उत्तरदायित्व निश्चित करण्याच्या पुढे जाऊन सुधारणांच्या दिशेने वाटचाल करण्याची वेळ आली आहे.’ याचाच अर्थ शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा हा केवळ पहिला टप्पा आहे. आता सरकारने परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता वाढवणे, पेपरफुटी रोखणे आणि विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी ठोस सुधारणा लागू करणे आवश्यक आहे.

शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी

दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा NEET पेपरफुटी वाद आणि देशभर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आला आहे. त्यामुळे सोनम वांगचुक यांचे हे वक्तव्य आंदोलनाच्या समर्थकांसाठी महत्त्वाचे मानले जात आहे. कारण सुरुवातीपासूनच ते जबाबदारी निश्चित करण्यासोबतच शिक्षण व्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्याची मागणी करत आहेत.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in