• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत मैदान सोडणार नाही; जंतरमंतरवर पुन्हा तरुणांचा एल्गार

July 20, 2026 by admin Leave a Comment


दिल्लीच्या जंतरमंतरवर आज दिवसभर जोरदार आंदोलन झालं. संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याद दिवशी कॉकरोच जनता पार्टीने उग्र आंदोलन केलं. तरुणांनी संसदेकडे कूच करताच पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. त्यानंतर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे आणखीनच तणाव निर्माण झाला. यावेळी पोलिसांनी अनेकांची धरपकड केली. संध्याकाळपर्यंत जंतरमंतर मैदान खाली झालं. त्यानंतर अभिजीत दीपके यांनी पुन्हा जंतरमंतरवर जाऊन आंदोलन धरणे आंदोलन सुरू केलं. जंतरमंतरवर अजूनही आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आम्ही मैदान सोडणार नाही, असा पवित्राच आंदोलकांनी घेतल्याने वातावरण पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जंतरमंतरवर शेकडो तरुण टॉर्च घेऊन ठाण मांडून बसले आहेत. या आंदोलकांना सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी संबोधित केले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देईपर्यंत आम्ही जंतरमंतर सोडणार नाही. आम्ही येथे ठामपणे उभे आहोत आणि अधिक आंदोलक आमच्यात सहभागी होण्याची वाट पाहत आहोत, असे सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सांगितले.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • समय रैना पुन्हा वादात? प्रसिद्ध कॉमेडियन प्रचंड भडकला, थेट व्हिडीओ पोस्ट करून…
  • भाईजानसोबत काम करण्याचं हिरानींचं स्वप्न ? पण एका गोष्टीमुळे रखडलं दोघांचं काम
  • त्या खास प्रयोगासाठी 1 हजार अंडवेअर जमिनीखाली पुरल्या, 2 महिन्यांनी खोदताच शास्त्रज्ञांना बसला प्रचंड धक्का, जमिनीमधून थेट…
  • नेपाळ पुराला जबाबदार असलेला ग्लेशियर कसा काय तुटला ? ग्लोबल वार्मिंग की आणखी काही कारण ?
  • यूपीच्या निवडणुकीमुळे मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर, अमित ठाकरेंची फडणवीसांवर टीका!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in