• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

धर्मेंद्रे प्रधान यांच्यानंतर या बड्या नेत्याचा राजीनामा घेऊन दाखवा? प्रसिद्ध अभिनेत्रीचं CJP ला ओपन चॅलेंज

July 26, 2026 by admin Leave a Comment


केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर अनेक तिर्व प्रतिक्रिया उमटत आहेत. सर्वच स्तरातून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचं समर्थन केलं जात आहे. आंदोलनाच्या काळात देखील अनेक सेलिब्रिटींनी विद्यार्थ्याचं समर्थन केलं, तर काही सेलिब्रिटी जंरतमंतर येथे देखील पोहोचले. पण झगमगत्या विश्वात अशी एक अभिनेत्री आहे, जिने सीजेपी आणि अभिजीत दीपके यांच्यावर निशाणा साधला आहे. एवढंच नाही तर, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आणखी एका बड्या नेत्याचं राजीनामा घेऊन दाखवा.. असं ओपन चॅलेंज सीजेपीला दिलं आहे.

काय म्हणाली श्वेता तिवारी

सीजेपीवर निशाणा साधणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री श्वेता तिवारी आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर श्वेता तिवारी हिने इन्स्टाग्रामवर अभिजीत दीपके यांच्या एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करत श्वेता म्हणाली, ‘पंजाबचे शिक्षण मंत्री कधी राजीनामा देणार आहेत? आणि कॉक्रोच जनता पार्टी तेथे कधी आंदोलनाला जाणार आहे?’, असे सडेतोड प्रश्न श्वेता तिवारी हिने उपस्थित केले आहेत.

अभिजीत दीपके काय म्हणाले…

श्वेता तिवारी हिने जो व्हिडीओ शेअर केला आहे, त्या व्हिडीओमध्ये अभिजीत दीपके बोलताना दिसत आहेत की, ‘धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा कोणती छोटी गोष्ट नाही. या आंदोलनाने दाखवून दिलं आहे की, जर कोणता केंद्रीय मंत्री स्वतःचं काम योग्य प्रकारे करत नसेल तर, जनता आणि विद्यार्थी एकत्र येत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करु शकतात आणि त्यांना पदावरुन हटवू शकतात.’

विद्यार्थ्यांपुढे झुकलं सरकार

नीट पेपरफुटीनंतर जवळपास 20 विद्यार्थ्यांनी स्वतःचं आयुष्य संपवलं. यानंतर दिल्ली येथेल जंतर – मंतर येथे सीजेपीने आंदोलनास सुरुवात केली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या बाजूनं उभं राहत सोनम वांगचुक उपोषणासाठी बसले. त्यानंतर 20 जुलै रोजी जंतरमंतर ते संसदेपर्यंत मोर्चा काढण्यात आला. अखेर या मोर्चाला देशव्यापी आंदोलनाचं स्वरुप प्राप्त झालं. सर्वच स्तरातून तिव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर शनिवारी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in