• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

धबधब्याखाली सर्वात बोल्ड सीन देणारी अभिनेत्री, एका रात्रीत बनली स्टार, त्या सीनची आजही…

July 30, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री मंदाकिनी आज आपला वाढदिवस साजरा करत आहेत. 1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत दमदार पदार्पण केले आणि एका रात्रीत स्टार बनल्या.

अनेक वर्षे चित्रपटसृष्टीपासून दूर असतानाही त्यांची लोकप्रियता आजही कायम आहे. मंदाकिनी हे त्यांचे मूळ नाव नव्हते. त्यांचे खरे नाव यास्मीन जोसेफ असून, दिग्दर्शक राज कपूर यांनी त्यांना 'राम तेरी गंगा मैली' साठी निवडल्यानंतर त्यांचे नाव बदलून 'मंदाकिनी' ठेवले.

'राम तेरी गंगा मैली'मधील त्यांच्या अभिनयासह काही धाडसी सीनमुळे त्या प्रचंड चर्चेत आल्या. या चित्रपटात राजीव कपूर यांच्यासोबतची त्यांची जोडी प्रेक्षकांना विशेष भावली आणि चित्रपट सुपरहिट ठरला.

यानंतर मंदाकिनी यांनी मिथुन चक्रवर्ती, संजय दत्त, गोविंदा आणि आदित्य पंचोली यांसारख्या आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम केले. 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जीते हैं शान से' या चित्रपटातील 'जूली जूली… जॉनी का दिल तुमपे आया जूली' हे गाणे आजही रसिकांच्या पसंतीस उतरते.

1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जोरदार' या चित्रपटानंतर त्यांनी अभिनयाला रामराम ठोकला आणि अनेक वर्षे चित्रपटसृष्टी तसेच प्रसिद्धीच्या झोतातून दूर राहणे पसंत केले. तरीही 'राम तेरी गंगा मैली'मधील त्यांची भूमिका आणि गाणी आजही चाहत्यांच्या स्मरणात तितकीच ताजी आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
  • मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार…
  • शिवसेना ठाकरे गटात खळबळ! 4 नगरसेवक भाजपच्या गळाला, पक्षप्रवेशाची तारीख ठरली
  • Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
  • ‘विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत’, पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in