• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘द न्यू यॉर्क टाइम्स’च्या POK विषयीच्या चुकीच्या हेडिंगवर भारताने लगेच घेतला आक्षेप, जगातल्या प्रतिष्ठीत वर्तमानपत्राला सरळ म्हटलं की..

July 30, 2026 by admin Leave a Comment


अमेरिकी वर्तमानपत्र ‘द न्यू यॉर्क टाइम्स’च्या एका हेडलाइनवर भारताने आक्षेप घेतला आहे. अमेरिकेतील भारतीय दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर या संदर्भात पोस्ट केली आहे. ‘द न्यू यॉर्क टाइम्स’ ने हेडींगमध्ये पाकिस्तान काश्मीर म्हटलं होतं. त्यावर भारताने लगेच आक्षेप घेतला. हा एक भ्रामक आणि चुकीचा शब्द असल्याचं भारताने म्हटलं. पाकिस्तान काश्मीर सारखं काही क्षेत्रच नाहीय. तो भारताचा भाग आहे आणि पाकिस्तानने बेकायदरित्या बळाकावला आहे असं भारतीय दूतवासाने म्हटलं आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश भारताचे अविभाज्य अंग होते आणि नेहमीच राहतील. उलट पाकिस्तानने या प्रदेशातील काही भाग बेकायदरित्या बळकावला आहे. तिथल्या लोकांविरुद्ध हिंसाचार करत आहेत असं भारतीय दूतावासाने म्हटलं आहे.

The New York Times पीओकेमधील स्थानिक निवडणुकीवर एक रिपोर्ट प्रकाशित केला. त्यात हेडलाइनमध्ये ‘पाकिस्तानी काश्मीरमध्ये निवडणूक मतदानाच्यावेळी हिंसाचार’ असं म्हटलं होतं. भारताने न्यू यॉर्क टाइम्सच्या हे हेडींगवर आक्षेप घेतला व जे चुकीचं लिहिलय ते दाखवून दिलं.

पूर्वीपासूनची भूमिका स्पष्ट केली

दूतावासाने अमेरिकी वर्तमानपत्राला उत्तर देताना भारताची पूर्वीपासूनची भूमिका स्पष्ट केली. जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भारताचे केंद्रशासित प्रदेश भारताचे अविभाज्य अंग आहेत आणि नेहमीच राहतील. पाकिस्तानने काही भाग बेकायदरित्या बळकावल्याचा आरोप केला. हिंसाचार आणि प्रशासकीय धोरणामुळे पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये राहणारे लोक त्रस्त आहेत असं भारतीय दूतावासने म्हटलं आहे.

लोकांच्या मनात रोष, संताप

‘द न्यूयॉर्क टाइम्स’ ने त्यांच्या एका वृत्तात पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमध्ये सुरु असलेल्या हिंसक विरोध प्रदर्शनांवर लिहिलं होतं. पीओकेमध्ये जॉइंट अवामी एक्शन कमिटीच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे. पीओकेची जनता आर्थिक मुद्दे, वाढती महागाई आणि राजकीय सक्तीमुळे तिथली जनता त्रस्त आहे. लोकांच्या मनात रोष, संताप आहे. लोक आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
  • मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार…
  • शिवसेना ठाकरे गटात खळबळ! 4 नगरसेवक भाजपच्या गळाला, पक्षप्रवेशाची तारीख ठरली
  • Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
  • ‘विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत’, पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in