• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

देशातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन कोणते? Delhi, Mumbai नाही, तर 172 वर्षांचा जुना इतिहास

April 19, 2026 by admin Leave a Comment


Biggest Railway Station in India: भारतीय रेल्वे ही देशातील दळणवळणातील सर्वात मोठी कडी आहे. लाखो प्रवासी रोज रेल्वेने प्रवास करतात. पण देशातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन कोणते आहे हे तुम्हाला माहिती आहे का? मुंबई आणि दिल्ली असं जर तुमचं उत्तर असेल तर थांबा. कारण हे उत्तर चुकीचं आहे. भारतातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन हे विशाल क्षेत्र, प्लॅटफॉर्मची संख्या आणि 172 वर्षे जुने आणि तितकेच ऐतिहासिक आहे. इंडियन रेल्वेनुसार, भारतातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन मुंबई अथवा दिल्ली नाही तर पश्चिम बंगालमधील हावडा हे आहे. देशातील सर्वात मोठ्या रेल्वे स्टेशनला हावडा असे म्हटले जाते. हे देशातील सर्वात जुने आणि मोठे रेल्वे स्टेशन आहे. हावडा रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्मची संख्या 23 इतकी आहे. तर नवीन दिल्ली येथील रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्मची संख्या जवळपास 16 तर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस(CSMT) ची संख्या जवळपास 18 प्लेटफॉर्म इतकी आहे.

रेल्वेचे पूर्वेतील सर्वात मोठे जंक्शन

हावड़ा जंक्शनमधील (Howrah Junction) प्लॅटफॉर्मची संख्या, प्रवाशांची क्षमता, येथील रेल्वेची ये-जा ही सर्वाधिक असल्याचे मानले जाते. अनेक वर्षांपासून हे जंक्शन कार्यरत आहे. हे देशातील सर्वात व्यग्र रेल्वे स्टेशनपैकी एक मानल्या जाते. हे पूर्वेतील रेल्वेचे मुख्य केंद्र आहे. देशाला कोलकत्त्याशी जोडण्याचे काम हे रेल्वे स्टेशन करते.

1854 मध्ये स्थापना,172 वर्षांचा मोठा इतिहास

हावडा जंक्शन केवळ एक रेल्वे स्टेशन नाही तर एक ऐतिहासिक वारसा आहे. या रेल्वे स्टेशनची निर्मिती ही ब्रिटिश काळात झाली होती. या रेल्वे स्टेशनचा इतिहास हा 172 वर्षांचा आहे. 1854 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने या रेल्वे स्टेशनची स्थापना केली होती. 15 ऑगस्ट 1854 रोजी हावाडा ते हुगळी या रेल्वे लाईनवर पहिली रेल्वे धावली होती. मुंबई ते ठाणे ही पहिली रेल्वे देशात धावली होती. या रेल्वेमुळे देशात रेल्वेचे युग सुरू झाल्याचे म्हटले जाते.

हावडा जंक्शनचे वैशिष्ट्ये

हावडा जंक्शन भारताच्या पश्चिम बंगाल स्थित देशातील सर्वात जुने रेल्वे स्टेशन आहे.

हावडा स्टेशनमधून 15 ऑगस्ट 1854 रोजी हावाडा ते हुगळी ही रेल्वे पहिल्यांदा धावली

हे देशातील सर्वात व्यग्र रेल्वे स्टेशन आहे. येथे 10 लाख प्रवासी ये-जा करतात

या रेल्वे स्टेशनवर एकूण 23 प्लेटफॉर्म आहेत. हे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे स्टेशनपैकी एक आहे

1905 मध्ये हावड़ा स्टेशनमध्ये 6 नवीन प्लॅटफॉर्म जोडल्या गेला

2009 मध्ये या रेल्वे स्टेशनचा विस्तार करण्यात आला. या हावडा रेल्वे स्टेशनवर 23 प्लेटफॉर्म आहेत

दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरूसह अनेक शहरांना हे रेल्वे स्टेशन जोडते



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Yavatmal | धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक आरोप, नेमकं प्रकरण काय?
  • Bigg Boss Marathi 6 Grand Finale : हाच स्पर्धक पैशांची बॅग उचलणार, अंतिम 2 स्पर्धक कोण? राखी सावंतची भविष्यवाणी
  • मोठी बातमी! राष्ट्रवादीत मोठी बंडखोरी, बारमतीची निवडणूक तीन दिवसांवर आली असतानाच 35 जणांचे तडाकाफडकी राजीनामे
  • SAW vs INDW : अनुष्का शर्माची टीम इंडियात एन्ट्री, 2 खेळाडूंचा पत्ता कट, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॅटिंग
  • खऱ्या मित्रानेच केला भारताचा घात, इराणकडून गो बॅकच्या धमकीने खळबळ; हादरवणारा व्हिडीओ लीक!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in