• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

देशातील सर्वात मोठी बँक १२ हजार कर्मचारी भरणार, २५० शाखा उभारणार

September 6, 2026 by admin Leave a Comment


बेकारीने त्रस्त असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. देशाची सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) १२ हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार आहेच तसेच या आर्थिक वर्षांत २५० शाखांचे नेटवर्क उभारण्याचे आपले उद्दीष्ठ असल्याचे सीबीआयचे चेअरमन सी. एस. शेट्टी यांनी सांगितले आहे. या आर्थिक वर्षात क्लेरिकल आणि ऑफीसर केडरची एकूण ११ ते १२ हजार कर्मचारी भरणार असल्याचे सी.एस.शेट्टी यांनी सांगितले आहे. निवृत्ती आणि नव्याने उद्भवणाऱ्या गरजांनुसार कर्मचाऱ्यांची संख्या बदलू शकते, वर्षाच्या अखेरीस आपण सुमारे १२,००० भरती पूर्ण करू, अशी मला अपेक्षा आहे,” असे त्यांनी पीटीआयशी (PTI) बोलताना म्हटले आहे.

गेल्यावर्षी आम्ही मोठ्या प्रमाणावर भरती केली असून त्यात १,५०० स्पेशलिस्ट आयटी अधिकाऱ्यांची भरती केली आहे. यावर्षी आम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणावर आयटी कर्मचारी ( information technology) भरण्याची गरज नाही असेही त्यांनी म्हटले आहे. आताच्या मार्च २०२६ च्या अखेर २.४५ लाख कर्मचाऱ्यांचा वर्कफोर्स झाला आहे. एसआयबी ही भारताची सर्वाधिक नोकरी देणारी संस्था ठरली आहे.

एसबीआयकडे ४,६४० अधिकारी, १९,३४० सहायक अधिकारी आणि १,६५३ कंत्राटी स्टाफ साल २०२५-२६ या आर्थिक वर्षात आहे. असे एकूण २५,६३३ कर्मचारी गेल्या वर्षी नोकरीवर घेतल्याचे बँकेच्या वार्षिक अहवालात म्हटले आहे. बँक शाखांचा विस्ताराबद्दल बोलताना शेट्टी यांनी सांगितले की इतके मोठे नेटवर्क असतानाही काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची जागा भरणे शिल्लक आहे. नवीन वसाहती विकसित होणे असणे असो किंवा व्यावसायिकदृष्ट्या सक्रिय भाग असोत, अशा ठिकाणी बँकेचा विस्तार नीट करण्यासाठी ही नवीन भरती कामी येईल असे म्हटले जात आहे. आम्ही काही बँक शाखांचे रॅशनलायईज करण्याचा विचार करत आहोत, याचा अर्थ आमची कर्मचारी संख्या दरवर्षी 200 ते 250 पर्यंत वाढेल,” असेही या अधिकाऱ्याने म्हटले आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये….
  • अंतराळ क्षेत्रात भारताची मोठी झेप, INSPACE चे अध्यक्ष पवन कुमार गोयंका यांनी सर्व सांगितलं…
  • Vidyanand Bapat : हा बाप झालाय का? विद्यानंद बापटवर किर्तनकार भंडारे खवळले
  • पॅरिसमध्ये BAPS हिंदू मंदिराचा ऐतिहासिक उद्घाटन सोहळा; पालखी यात्रेने सांस्कृतिक महोत्सवाची दिमाखदार सुरुवात
  • ना वीज, ना मोबाईल, ना इंटरनेट! भारतातील हे गाव जगतंय शेकडो वर्षांपूर्वीचं आयुष्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in