
जगभरात मुस्लीम धर्मीय लोकांची संख्या खूप आहे. असा एखादाच देश असेल जिथे मुस्लीम समाज आढळत नाही. या जगात काही देश तर असे आहेत जे मुस्लीम राष्ट्र म्हणून ओळखले जातात. परंतु भारतात असे एक राज्य आहे जिथे मुस्लिमांचे प्रमाण खूपच कमी आहे.
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. आपल्या देशात सर्वच जाती-धर्माचे लोक राहतात. सर्वधर्मसमभावाला केंद्रस्थानी ठेवून भारतात बंधूभाव जपला जातो. भारतात काही राज्यांत मुस्लिमांचे प्रमाण जास्त आहे. तर काही ठिकाणी मुस्लीम लोकसंख्या कमी आहे.
देशातील 2011 सालच्या जनगणनेनुसार पुर्व-उत्तर राज्यांत मुस्लीम लोकसंख्या खूपच कमी आहे. ज्या राज्यांत मुस्लीम समाज कमी आहे, तेथे कोणत्या धर्माचे लोक राहतात हे जाऊन घेणेही मोठे रंजक आहे.
भारतात सिक्कीम हे सर्वाधिक कमी मुस्लीम लोकसंख्या असलेले राज्य आहे. या राज्यात एकूण लोकसंख्येपैकी फक्त एक ते दोन मुस्लीम समुदाय आहे. येथील बहुसंख्या लोक बौद्ध आणि हिंदू धर्माचे पालन करतात.
मिझोरम, अरुणाचलप्रदेश या दोन राज्यांतही मुस्लीम लोकसंख्या खूप कमी आहे. मिझोरममध्ये एकूण लोकसंख्यैपैकी फक्त 1.35 टक्के लोकसंख्या मुस्लीम समाजाची आहे. तर अरुणाचल प्रदेशमध्ये मुस्लीम लोकसंख्येचे प्रमाण फक्त 1.95 टक्के आहे. १




Leave a Reply