• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

देशभरातून स्विगी, झोमॅटोने विद्यार्थ्यांना जंतर मंतरवर जेवण पाठवतायेत लोकं

July 21, 2026 by admin Leave a Comment


शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या महिन्याभरापासून दिल्ली येथील जंतर -मंतवर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. दरम्यान सोमवारी आंदोलकांनी थेट संसदेवर मोर्चा काढला, यादरम्यान आंदोलक आणि पोलीस आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. या घटनेत अनेक आंदोलक जखमी झाले, त्यामुळे आता देशभरात वातावरण तापलं आहे. सोमवारी झालेल्या लाठीचार्जनंतर देखील आंदोलकांनी माघार घेतलेली नाहीये, ते शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीन्याम्यावर ठाम आहेत. पुन्हा एकदा जंतर-मतंरवर आंदोलन सुरू झालं आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येनं विद्यार्थी सहभागी झाले आहेत.  देशभरातून विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत.

या आंदोलनाला आता देशभरातून मोठा पाठिंबा मिळत असल्याचं दिसून येत आहे. देशभरातील लोकं स्विगी, झोमॅटो सारख्या फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून या आंदोलकांच्या जेवणाची सोय करत आहेत. हे लोक स्विगी, झेमॅटोवरून जेवण ऑर्डर करत आहेत, आणि हे ऑर्डर केलेलं जेवणं जंतरमंतरमध्ये आंदोलासाठी बसलेल्या विद्यार्थ्यांना नेऊन देण्यास सांगत आहेत.  त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था होत आहे. यावरून या आंदोलनाला देशभरातून किती मोठा पाठिंबा मिळत आहे हे दिसून येत आहे.

तर दुसरीकडे दिल्लीमधील स्थानिक नागरिक देखील या आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मदत करताना दिसत आहेत. जंतर मंतरवर लंगर सुरू करण्यात आला आहे. ज्यांना जे शक्य आहे, ते अन्नपदार्थ घेऊन नागरिक जंतर मंतरवर येत आहेत, स्थानिक लोकांकडून विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे.  सोमवारी घडलेल्या लाठीचार्जच्या घटनेनंतर आंदोलकांना होणाऱ्या मदतीचा ओघ वाढल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान दुसरीकडे या आंदोलकांना आता विरोधी पक्षांचा पाठिंबा देखील मिळाला आहे. आज सकाळीच शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांची भेट घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील जंतर मंतरवर हजेरी लावली. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियकां गांधी यांनी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केलं आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला सोडून जान्हवी कपूरने उरकला प्रसिद्ध अभिनेत्यासोबत साखरपुडा! व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ
  • Nepal flood: ब्रिज, डीएनए विश्लेषण टीम, अन्न… भारताने नेपाळसाठी आतापर्यंत काय पाठवले?
  • बजेट फक्त 2 कोटी, नफा तब्बल 800%! प्रेमानंद महाराजांचा सल्ला मानला अन् चित्रपट ठरला सुपरहिट
  • Nepal Flood: हिमालयीन तलाव बनले टाईम बॉम्ब! भारतालाही महापूराचा मोठा धोका?
  • Horoscope Today 30th August 2026 : स्वप्नपूर्तीच्या दिशेने मोठे पाऊल.. आजचा दिवस या राशीसाठी खासम् खास ! वाचा तुमचं भविष्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in