• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

देवा पुन्हा एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा होणार? पुरवठा आणि बुकिंगबाबत काय अपडेट जाणून घ्या..

July 10, 2026 by admin Leave a Comment


इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. एलपीजी गॅस घेऊन भारताच्या दिशेने निघालेल्या एका जहाजावर मोठा हल्ला होर्मुज खाडीत करण्यात आला. यासोबतच अमेरिकेकडून इराणवर मोठे हल्ले करण्यात आले. त्यामध्येच होर्मुज खाडीतही तणाव वाढला. होर्मुज खाडीत सतत गोळीबार केला जात आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा एलपीजीचे टेन्शन वाढले. पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. यासोबतच जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. भारतात दाखल होणारा 60 टक्के एलपीजी गॅस हा होर्मुज खाडीच्या माध्यमातून दाखल होतो. इराण आणि अमेरिका युद्धात एलपीजी गॅस सिलेंडरच्य किमतीमध्ये मोठी वाढ झाली. त्यामध्येच होर्मुज खाडीत तणाव वाढल्याने आता पुन्हा तुटवडा निर्माण होऊ शकतो.

केप्लर एनालिस्ट सुमित रितोलिया यांच्या म्हणण्यानुसार, सध्या जी परिस्थिती आहे, तिचा भारतामध्ये होणाऱ्या एलपीजी गॅस आयातीवर काही परिणाम झाला नाही. भारतीय रिफायनरी कंपन्या तेल विविध माध्यमातून भारतात आणत आहेत. होर्मुज खाडीत तणाव आहे. गेल्या 100 दिवसांपासून भारतात स्थिती सामान्यच आहे. भारत हा मोठ्या प्रमाणात कच्चे तेल रशियाकडूनच आयात करतो.

सऊदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात यांच्याकडून होणाऱ्या पुरवठ्याकरिता अजून काही मार्ग आहेत. आज पूर्ण देशभरात एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल हा सरकारकडून करण्यात आला नाहीये. 14.2 किलो एलपीजी गॅस सिलेंडरचा दर 942 आहे आणि 19 किलो एलपीजी गॅस सिलेंडरचा दर 2930 रूपये आहे. मात्र, परिस्थिती जर अधिक बिघडली तर केंद्र सरकारकडून काही बदल केले जाऊ शकतात.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असताना व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती सरकारकडून कमी करण्यात आल्या. त्यातच आता पुन्हा तणाव वाढला. जर होर्मुज खाडीतील स्थिती सामान्य झाली नाही तर केंद्र सरकारकडून याबाबत काही वेगळे निर्णय घेतला जाऊ शकतात. सध्या तरी भारताकडे मुबलक प्रमाणात साठा आहे. जागतिक बाजारात पुन्हा एकदा खळबळ उडाली.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in