• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘देवा’च्या इच्छेने मी मंत्रिमंडळातून बाहेर, भाजपाच्या बड्या नेत्याने वात पेटवली; म्हणाले… तर जनता नेत्यांवर विश्वास ठेवणार नाही

July 15, 2026 by admin Leave a Comment


Sudhir Mungantiwar :  भाजपा हा केडरबेस पक्ष आहे. वरिष्ठांनी दिलेला आदेश खालचे नेते लगेच पाळतात. त्या आदेशावर कोणताही प्रश्न उपस्थित केला जात नाही. भाजपात नेहमीच अनपेक्षित असेच निर्णय घेतले जातात. कोणालाही फारसा माहिती नसलेला चेहरा भाजपाकडून समोर आणला जातो. अशा चेहऱ्यांना भाजपा कधी केंद्रात मंत्री करते. तर कधी पक्षातच मोठी जबाबदारी दिली जाते. काही बड्या नेत्यांसोबत मात्र कधीकधी अनपेक्षितही घडलेलं आहे. अनेक महत्त्वाच्या नेत्यांचे मंत्रिपद काढून घेण्यात आले आहे. तर काही नेत्यांना अडगळीत टाकून देण्यात आलं. भाजपामध्ये असे बरेच नेते आहेत. दरम्यान, मंत्रिपदावर असताना महत्त्वाचे निर्णय घेणारे भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवर यांच्याकडे सध्या कोणतेही मंत्रिपद नाही. याबाबत आता मुनगंटीवार यांनी भाष्य केलं आहे.

एकनाथ शिंदे यांचे महत्त्व कमी केल्यास…

माजी मंत्री तथा भाजपाचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार पंढरपूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी बोलताना त्यांनी सध्या राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. लवकरच शरद पवार यांचा पक्ष एनडीएत सहभागी होणार आहे, असं बोललं जातंय. त्यासाठी पडद्यामागे घडामोडी वाढल्या असल्याचाही दावा केला जातोय. यावर मुनगंटीवार यांनी भाष्य केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचा पक्ष एनडीएत सहभागी होणार नाही, हे स्पष्टपणे सांगितलेले आहे. या सर्व दंतकथा आहेत, असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर पुढच्याच 15 दिवसात शरद पवार एनडीएत सहभागी झाले तर जनतेचा नेत्यांवरील विश्वास कमी होईल, असं मत मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं.

राजकारणात कोणीच कोणाचे महत्त्व कमी करू शकत नाही. एकनाथ शिंदे हे आमचे मित्र आहेत. त्यांचं महत्त्व भाजपा कधीच कमी करणार नाही. तसा प्रयत्न भाजपाने केला तरीही ते जनताला खपणार नाही, असं मोठं विधान सुधीर मुनगंटीवार यांनी केलं.

देवाच्या इच्छेने मी मंत्रिमंडळातून बाहेर

तसेच, शरद पवारांचा पक्ष एनडीएमध्ये येईल याबाबत मला व्यक्तिशः शंका आहे, असंही ते पुढे बोलताना म्हणाले. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे कोणतेही मंत्रिपद नाही. यावर बोलाना देवाच्या इच्छेने मी मंत्रिमंडळातून बाहेर आहे, असं सूचक विधान त्यांनी केलं आहे. त्यामुळे आता त्यांच्या या विधानाचा वेगळा राजकीय अर्थ काढला जात आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 2 जेसीबी, 8 थार, 175 दुचाकी जिंकणारा मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड
  • Nagpur : नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
  • Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
  • जर कोणाला वाटत असेल की भारतात मुस्लिम नसावेत, तर तो हिंदू नाही; न्यूयॉर्कमध्ये मोहन भागवत यांचे वक्तव्य
  • प्रवाशांना सामावून घेण्यासाठी रेल्वे मार्गाचे चौपदरी होणार, या 7 मार्गांवर चालणार काम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in