• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

देवशयनी एकादशी ‘या’ राशींसाठी ठरणार अत्यंत शुभ, वाढेल जीवनात सुख आणि समृद्धी

July 19, 2026 by admin Leave a Comment


दरवर्षी, आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला देवशयनी एकादशीचा उपवास केला जातो. सनातन धर्मात ही एकादशी अत्यंत विशेष मानली जाते, कारण याच दिवशी विश्वाचे रक्षक भगवान विष्णू योगनिद्रा ग्रहण करतात, आणि येथूनच चार महिन्यांच्या चातुर्मासाची सुरुवात होते, जो कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या देवूउठनीला संपतो. द्रिक पंचांगानुसार यावर्षी देवशयनी एकादशी 25 जुलै रोजी आहे.

देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची मोठ्या भक्ती भावाने उपासना केली जाते. तसेच यादिवशी उपवास आणि पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते. भगवान विष्णूंनी या एकादशीपासून योगनिद्रा घेतली असली तरी, त्यांच्या पूजेचे आणि उपवासाचे महत्त्व कमी होत नाही. या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद मिळतो. या वर्षीची देवशयनी एकादशी ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्याही खूप विशेष असणार आहे. कारण या एकादशीनिमित्त मेष, वृषभ, कन्या आणि तूळ राशीच्या लोकांना या दिवसाचा विशेष लाभ होईल. या राशींच्या लोकांच्या जीवनात सुख आणि समृद्धी वाढू शकते.

मेष राशी

मेष राशीच्या लोकांना देवशयनी एकादशीला शुभ फळे मिळू शकतात. भगवान विष्णूच्या आशीर्वादाने उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो. करिअरमध्ये प्रगती शक्य आहे. वैवाहिक जीवनात सुखात वाढ होऊ शकते.

वृषभ राशी

देवशयनी एकादशीला वृषभ राशीच्या व्यक्तींना त्यांच्या करिअरमध्ये यश मिळू शकते. त्यांना कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम दिसू शकतात. भगवान विष्णूच्या आशीर्वादाने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. तुमच्या बचतीत वाढ होऊ शकते.

कन्या राशी

कन्या राशीच्या लोकांसाठी देवशायनी एकादशी आर्थिकदृष्ट्या खूप फायदेशीर ठरू शकते. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. तुम्हाला करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळू शकतात. तुम्हाला मित्र आणि प्रियजनांकडून पाठिंबा मिळू शकतो.

तूळ राशी

तूळ राशीच्या व्यक्तींना देवशयनी एकादशीला अनेक गोष्टी साध्य होऊ शकतात. तुमच्या मेहनतीचे फळ कामाच्या ठिकाणी मिळू शकते, ज्यामुळे सकारात्मक परिणाम दिसून येतील. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन अधिक सुसंवादी होऊ शकते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बड्या नेत्याचं नाव… Instagram वर इशारा; हातावर नोट लिहून डॉक्टराने संपवलं जीवन
  • CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात… राजकारणातील हालाचली वाढल्या
  • व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
  • Astrology 2026: सप्टेंबर महिना तुमच्या राशीसाठी कसा जाणार? सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र ग्रह स्थान बदलणार, असे असतील योग
  • विजय-रश्मिकाच्या लग्नानंतर पुन्हा चर्चेत जुनं प्रेम; अभिनेत्याच्या वक्तव्याने वाढली उत्सुकता

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in