• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दुष्काळी बीडमध्ये अनोखा चमत्कार, कोरडीठाक विहीर अचानक पाण्याने तुडूंब भरली; लोकांची गर्दी!

September 4, 2026 by admin Leave a Comment


Beed Bhagwan Gad Well : दुष्काळी बीड जिल्ह्यात निसर्गाचा अनोखा चमत्कार समोर आला आहे. भगवानगडाच्या पायथ्याशी असलेल्या बीडच्या घोगस पारगाव शिवारात असलेली एक विहीर अचानक पाण्याने तुडुंब भरली आहे.

भगवानगडाच्या मालकीच्या जागेत असलेल्या या विहिरीला अचानक पाणी आल्याने चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे या विहिरीपासून अवघ्या शंभर फुटावर असलेल्या विहिरी कोरड्या ठाक आहेत.

मात्र या विहिरीलाच पाणी आले कसे?. निसर्गाचा चमत्कार की भगवान बाबांचा चमत्कार अशी चर्चा या परिसरात रंगली आहे. विशेष म्हणजे भगवानगडावर या अगोदर पाणीटंचाई होती. मंदिराच्या बांधकामासाठी देखील पाणी कमी पडत होते.

विहिरीला पाणी आल्याने पाण्याचा प्रश्न मिटला आहे असं भाविकांनी सांगितलं. या विहिरीला पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे त्यामुळे भूगर्भ शास्त्रज्ञांनी या ठिकाणी येऊन नेमके काय झाले आहे हे सांगावे अशी मागणी ही नागरिकांनी केली.

दरम्यान, आता ही विहीर पाण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. पाण्याने भरलेल्या या विहिरीचे काही फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मनोज जरांगेंच्या लढ्याला सर्वात मोठं यश, सरकारने तडकाफडकी घोषणा केली, विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर!
  • भाजी कापण्याच्या सुरीने आईवरच पोटच्या मुलाचे सपासप वार, धक्कादायक घटनेने महाड हादरले…
  • राज्यात लवकरच नवं ऑपरेशन टायगर, शिंदेंच्या बड्या मंत्र्याने थेट सांगितलं; राजकीय वर्तुळात एकच चर्चा!
  • Photographer Murder Case : त्याचा 20 दिवसांपूर्वीच मृत्यू, तरी गर्लफ्रेंडसोबत सुरू होती रोमँटिक चाटिंग, सत्य समोर येताच पोलीसही हादरले; काय घडलं?
  • Salman Khan : कॅमेरा समोर येण्याची गरजच नाही…सलमान खानचा पारा चढला ! नक्की काय घडलं?; VIDEO व्हायरल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in