• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दिल्लीत मोठी घडामोड, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह राहुल गांधी यांच्या भेटीला!

July 21, 2026 by admin Leave a Comment


CJP Delhi Protest : दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनाला देशभारातून पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनात देशातील हजारो तरुण सामील झाले आहेत. 20 जुलै रोजीच्या संसद मार्चवर पोलिसांनी लाठीमार केल्यामुळे आंदोलकांत सध्या संताप आहे. दुसरकीकडे देशातील महत्त्वाचे राजकीय नेतेदेखील आंदोलनस्थळी जाऊन आपला  पाठिंबा दर्शवत आहेत. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, खासदार शरद पवार यांनी जंतर-मंतरवर जाऊन सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांची भेट घेतली आहे. तर दुसरीकडे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ठिय्या मांडला आहे. काहीही झालं तरी आम्ही आंदोलनस्थळी जाणार, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. या सर्व घडामोडी घडत असताना आता राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी केंद्र सरकारने प्रतिनिधी पाठवला आहे.

राहुल गांधी यांचा ठिय्या

जोपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, अशी सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांची भूमिका आहे. त्यानंतर आता 20 जुलै रोजीचे सीजेपीचे आंदोलन आणि त्यानंतर पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेला लाठीचार्ज यामुळे विरोधक संतप्त झाले आहेत. राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी तसेच काँग्रेस पक्षाचे इतर खासदार हे जंतर-मंतरवर निघाले आहेत. ते अभिजित दीपके यांची भेट घेणार आहेत. त्याआधी गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या मांडला. यावेळी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह राहुल गांधींच्या भेटीला

जंतर मंतरवरील आक्रमक आंदोलक, या आंदोलनस्थळी विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेटी आणि राहुल गांधी यांचा पवित्रा लक्षात घेता केंद्र सरकार अलर्ट मोडवर आहे. मोदी सरकारने राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्यासाठी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना पाठवले आहे. सिंह यांनी काँग्रेसच्या आंदोलनस्थळी जाऊन राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता काँग्रेस आपला ठिय्या संपवणार का? तसेच राहुल गांधी हे अभिजित दीपके यांची भेट घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Laxman Hake: मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारली तरी… लक्ष्मण हाके यांचा सरकारला मोठा इशारा, म्हणाले अफाट ओबीसी…
  • Arshad Warsi: या सगळ्याची सुरुवात कंगनाने केली..; अर्शद वारसी स्पष्टच बोलला, नेमका वाद काय?
  • मी टिकली घेऊन लगेच येते; लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवरी गायब, नेमकं काय घडलं?
  • भारताचा चीनला दणका, थेट भूतान येणार भारतीय रेल्वेच्या नकाशावर, ज्याची भीती तेच घडतंय..
  • Nepal Flood Alert: नेपाळमध्ये पुन्हा महापुराची धास्ती; नदीचा आवाज वाढताच नागरिकांना अलर्ट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in