
भारत भूतानमध्ये रेल्वे मार्ग उभारणार आहे. हा चीनसाठी मोठा धक्का आहे. त्यातच भारताने चीनला मिरच्या लागणारा निर्णय घेतला. मुळात भारत आणि भूतान रेल्वे मार्गच चीनला पटत नाही. ही केवळ एकच रेल्वे लाईन नाही, तर दोन रेल्वे मार्ग उभारले जाणार आहेत. आजवर भूतानमध्ये रेल्वे सेवा उपलब्ध नाही. तिथे यापूर्वी कधीही रेल्वे मार्ग अस्तित्वात नव्हता. भारत भूतानला दोन दिशांनी रेल्वे जाळ्याशी जोडणार आहे. याकरिता 4000 कोटी रुपये खर्च येणार आहे. भारतीय रेल्वे आणि संरक्षण मंत्रालयाने भारत भूतान सीमा कनेक्टिविटी अधिक मजबूत करण्यासाठी काम अधिक जलद केले. सरकारने सिक्किमच्या 2027 आणि भूटानच्या 2029 रेल्वे सेवा सुरू करण्याचे टार्गेट ठरवले आहे. भारत सरकारचा हा निर्णय चीनचे टेन्शन वाढवणारा आहे. चिकन नेकवर लक्ष ठेवणाऱ्या चीनसाठी हा धक्का आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, भारत भूतानला जोडण्यासाठी 69 किलोमीटर लांब आंतरराष्ट्रीय रेल्वे लाईनसाठी भारत सरकार 3500 कोटी खर्च करत आहे. सरकारने आता या रेल्वे लाईनला विशेष योजनेचा दर्जा दिला आहे. अडचणी आणि जमीन संपादन करण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला.
लवकरच दोन्ही देशात ही महत्वाची रेल्वे लाईन तयार होईल, ज्यामुळे व्दिपक्षीय संबंध आणि व्यापाराला नवी दिशा मिळेल. भूतानच्या गेलेफू माइंडफुलनेस शहराला थेट जोडले जाईल. ज्यामुळे व्यापाराला मोठी चालना मिळेल. सीमेवरही काही गोष्टी बदलतील. चीनला ही रेल्वे लाईन अजिबात पटत नाही. मात्र, शेवटी चीनच्या हातात काही नाहीये.
गेल्या काही दिवसांपासून चीन सीमेवर पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर देत आहे. चीन भारताच्या हद्दीत प्रवेश करत असल्याचाही आरोप केला जात आहे. भारत आणि चीनमध्ये मोठी सीमा आहे. अरूणाचल प्रदेशमधील सीमा भागात राहणारे लोक चीन भारतीय जमिनीवर ताबा मिळवत असल्याचे सांगत आहेत. भारतही आता सीमा भागात आपली ताकद निर्माण करत आहे. त्यातच चीनला एका मागून एक धक्के भारत देत आहे.
Leave a Reply