• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दिल्लीत महाराष्ट्राचा डंका, तब्बल 5 खासदारांना संसद रत्न पुरस्कार जाहीर, पाहा यादी

May 24, 2026 by admin Leave a Comment


संसदेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिला जाणारा प्रतिष्ठित संसद रत्न पुरस्कार २०२६ नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यंदाच्या संसद रत्न पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्राचे विशेष वर्चस्व पाहायला मिळत आहे. यात महाराष्ट्रातील पाच खासदारांना संसद रत्न या बहुमानाने गौरवण्यात येणार आहे. यामध्ये लोकसभा खासदार श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, डॉ. हेमंत विष्णू सावरा, पुण्याच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, जळगावच्या लोकसभा खासदार स्मिता उदय वाघ अशा पाच खासदारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यात दोन महिला खासदारांनाही संसद रत्न पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

संसद रत्न पुरस्कार समितीच्या अध्यक्षा ॲड. प्रियदर्शनी राहुल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्युरी समितीने यंदाच्या पुरस्कारांसाठी १० लोकसभा खासदार, २ राज्यसभा खासदार आणि ४ संसदीय स्थायी समित्यांची निवड केली आहे. २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरपर्यंत संसदेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील ५ खासदारांना संसद रत्न पुरस्कार

यात महाराष्ट्रातील ५ खासदारांना संसद रत्न पुरस्कार दिला जाणार आहे. वैयक्तिक श्रेणीमध्ये या खासदारांची निवड झाली आहे. यात लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे, लोकसभा खासदार नरेश गणपत म्हस्के, लोकसभा खासदार डॉ. हेमंत विष्णू सावरा, जळगावच्या लोकसभा खासदार स्मिता उदय वाघ आणि पुण्याच्या राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांचा समावेश आहे.

या पुरस्कारांची घोषणा करताना ॲड. प्रियदर्शनी राहुल यांनी भाजप खासदार स्मिता उदय वाघ यांच्या कर्तव्याप्रती असलेल्या निष्ठेचे विशेष कौतुक केले. स्मिता वाघ या सध्या कर्करोगाशी झुंज देत आहेत. अत्यंत कठीण परिस्थितीतही त्यांचे केमोथेरपीचे सत्र पूर्ण करून त्या संसदेच्या अधिवेशनाला उपस्थित राहतात. त्यांच्या या वचनबद्धतेचा समितीने प्रामुख्याने गौरव केला आहे.

दोन माजी मुख्यमंत्र्यांनाही संसद रत्न पुरस्कार

महाराष्ट्राव्यतिरिक्त देशातील इतर महत्त्वाच्या खासदारांनाही या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगदंबिका पाल, राजस्थानचे पी. पी. चौधरी, झारखंडचे निशिकांत दुबे, उत्तर प्रदेशचे प्रवीण पटेल, झारखंडचे विद्युत बरन महतो आणि राजस्थानचे लुम्बाराम चौधरी यांचा समावेश आहे. या विजेत्यांमध्ये जगदंबिका पाल आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री डॉ. चरणजितसिंग चन्नी या दोन माजी मुख्यमंत्र्यांचा, तर गुजरातचे माजी उपमुख्यमंत्री नरहरी अमीन यांचा समावेश आहे.

4 संसदीय समित्यांचाही होणार गौरव

खासदारांसोबत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ४ संसदीय स्थायी समित्यांचाही गौरव केला जाणार आहे.

१. कृषी समिती अध्यक्ष – डॉ. चरणजितसिंग चन्नी
२. वित्त समिती: अध्यक्ष – भर्तृहरी महताब
३. ग्रामीण विकास आणि पंचायती राज समिती: अध्यक्ष – सप्तगिरी शंकर उलाका
४. कोळसा आणि खाण समिती: अध्यक्ष – अनुराग ठाकूर

यंदा जुलै २०२६ मध्ये नवी दिल्ली येथे १६वा संसद रत्न पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. गेल्या १५ सोहळ्यांमध्ये एकूण १४३ पुरस्कार देण्यात आले आहेत. यंदाच्या सोहळ्यात १५० वा पुरस्कार प्रदान केला जाईल. हा पुरस्कार नागरी समाजाच्या वतीने दिला जातो आणि सर्व विजेते स्वतः उपस्थित राहून हा पुरस्कार स्वीकारणार आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • चीन-पाकिस्तानला धडकी भरवणारी बातमी, अवघ्या 90 सेकंदात होणार खात्मा; भारताची मोठी योजना काय?
  • बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान…त्या विधानावर किरण पावसकरांचं शेवटी स्पष्टीकरण; म्हणाले मी कधीही…
  • पक्षप्रवेश झाला, आता पुढे काय? शिर्डीत पाय ठेवताच भाऊसाहेब वाकचौरेंनी सांगितला प्लॅन!
  • मोठी बातमी! धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंढेंना पदावरून हटवलं, आता नव्या अधिकाऱ्याकडे कार्यभार
  • Skoda च्या ‘या’ SUV चा भारतात धुमाकूळ; 5 वर्षांत 1 लाखाहून अधिक ग्राहकांनी खरेदी करून रचला इतिहास

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in