
गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. आज प्रधान यांनी त्यांच्याकडे असलेल्या शिक्षण खात्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आता या खात्याची जबाबदारी प्रल्हाद जोशींकडे देण्यात आली आहे. नवीन शिक्षणमंत्र्यांच्या नावाची घोषणा होईपर्यंत जोशी या खात्याचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रधान यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
शिक्षण खात्याची जबाबदारी प्रल्हाद जोशींकडे
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी सध्या प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींनी प्रल्हाद जोशी यांना त्यांच्या विद्यमान मंत्रालयांसोबतच शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्याचा आदेश जारी केला आहे. यानुसार प्रल्हाद जोशी त्यांच्या विद्यमान जबाबदाऱ्यांसोबतच शिक्षण मंत्रालयाचे कामकाजही पाहणार आहेत. मात्र भविष्यात नवीन शिक्षणमंत्र्याच्या नावाची घोषणा झाल्यानंतर जोशी यांना या जबाबदारीतून मुक्त केले जाणार आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply