• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

थलपती विजय यांच्यासोबतच्या नात्यावरून ट्रोल करणाऱ्यांना त्रिशाचं सडेतोड उत्तर; ‘नाक खुपसण्याची..’

June 3, 2026 by admin Leave a Comment


दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री त्रिशा कृष्णन गेल्या काही दिवसांपासून सतत सोशल मीडियावर चर्चेत आहे. एकीकडे तिचा ‘करुप्पू’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे, तर दुसरीकडे तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते थलपती विजय यांच्यासोबत तिचं नाव सतत जोडलं जात आहे. त्रिशा किंवा विजय यांनी या चर्चांवर कधीच थेट प्रतिक्रिया दिली नाही. मात्र सोशल मीडियावर अप्रत्यक्ष पोस्ट लिहित त्रिशाने अनेकदा ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे. आता पुन्हा एकदा तिने इन्स्टाग्रामवर क्रिप्टिक पोस्ट लिहिली आहे.

त्रिशाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिच्या पाळीव श्वानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तो श्वान शांतपणे अंथरुणावर आराम करताना दिसून येत आहे. याच व्हिडीओवर तिने लिहिलं, ‘माझ्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करण्याची परवानगी फक्त नाकालाच आहे.’ हे कॅप्शन देतानाच तिने व्हिडीओमध्ये श्वानाच्या नाकाला झूम केलं आहे. त्रिशाने तिच्या वैयक्तिक आयुष्यात नाक खुपसणाऱ्यांना अप्रत्यक्षपणे हा टोला लगावला आहे.

त्रिशाची पोस्ट-

थलपती विजय हे मुख्यमंत्री होण्याच्या आधीपासूनच त्रिशासोबत त्यांच्या नातेसंबंधाची चर्चा सुरू आहे. तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत विजय यांच्या तमिळगा वेत्री कझगमचा (टीव्हीके) मोठा विजय झाला. 4 मे रोजी या निवडणुकीचा निकाल लागला होता आणि त्याच दिवशी त्रिशाचा वाढदिवस होता. निकालाच्या दिवशी सकाळी ती तिरुपती बालाजींच्या दर्शनाला गेली होती आणि त्यानंतर संध्याकाळी ती विजय यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचली होती. 10 मे रोजी विजय यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तेव्हा या शपथविधी सोहळ्यात सर्वाधिक चर्चा त्रिशा कृष्णनचीच झाली होती.

निळ्या रंगाची साडी नेसून अत्यंत पारंपरिक अंदाजात त्रिशा या शपथविधी सोहळ्यात दिसली होती. त्यानंतर याच साडीतील फोटो पोस्ट करत The love is always louder अर्थात प्रेमाचा आवाज नेहमीच मोठा असतो.. अशा आशयाचं कॅप्शन तिने लिहिलं होतं. तिच्या या कॅप्शनमुळे विजय आणि तिच्या नात्याच्या चर्चांना आणखी हवा मिळाली. तर दुसरीकडे विजय यांची पत्नी संगीता सोरनलिंगमने घटस्फोटासाठी अर्ज करत त्यांच्यावर एका अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला आहे. शपथविधी सोहळ्याला विजय यांची पत्नी आणि मुलंसुद्धा अनुपस्थित होते.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रुपाली चाकणकर बदनामी प्रकरणात मोठी कारवाई, दिपाली सय्यद, अंधारे यांच्यासह 19 जणांविरोधात गुन्हा दाखल!
  • रक्षाबंधनावर आधारित सुपरहिट गाणं, 43 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट, आशा भोसले यांनी दिलेला आवाज
  • Abhijit Dipke : अभिजीत दीपकेंचा मोठ्या बैठकीपूर्वीच सरकारला थेट इशारा, म्हणाला, पुन्हा अशी चूक…
  • खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी थेट खात्यावर पडणार?
  • ज्याची भीती होती तेच घडलं, यशस्वी जयस्वालवर ICC ची मोठी कारवाई, करिअरवर लागला डाग

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in