• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

त्या टेबलावर महिलांची इज्जत लुटली गेली, देवाच्या नावाखाली…रुपाली पाटील ठोंबरेंचा चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप!

June 11, 2026 by admin Leave a Comment


Rupali Chakankar : भोंदूबाबा अशोक खरात महिला लैंगिक अत्याचार प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर बरेच आरोप झाले. चाकणकर आणि खरात यांच्यात आर्थिक संबंध होते, असा दावा करण्यात आला. चाकणकर आणि त्यांचे कुटंबीय यांची चौकशीही करण्यात आली. आता याच चाकणकर यांनी सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. माझा खरातशी संबंध नाही. खरातशी माझा कोणताही आर्थिक संबंध नाही. मला बदनाम करण्यात आले, असं चाकणकर या व्हिडीओत म्हणाल्या आहेत. दरम्यान, आता चाकणकर यांच्या या व्हिडीओनंतर रुपाली पाटील ठोंबरे चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी खरातच्या व्हायरल व्हिडीओंचा आधार घेत चाकणकर यांच्यावर सडकून टीका केली आहे.

खरात आणि चाकणकर यांचे पाद्यपूजनाचे व्हिडीओ आले

रुपाली ठोंबरे पाटील यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. यावेळी बोलताना भोंदूबाबा खरात प्रकरण समोर आल्यानंतर खरात आणि चाकणकर यांचे पाद्यपूजनाचे व्हिडीओ आले. त्यांनीच भोंदूबाबाची तक्रार घ्यायची नाही, असे पोलिसांना सांगितले होते, असा गंभीर आरोप रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला. तसेच खरातने ज्या ज्या वेळी महिलांचे लैंगिक शोषण केले. त्यावेळी चाकणकर या महिलांचे रक्षण करण्यासाठी त्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर होत्या. त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला, असेही रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या.

तुमच्या या गाणेरड्या प्रकारामुळेच….

स्त्रींचा लढा लढण्यासाठीच चाकणकर यांना महिला आयोगाच्या पदावर बसवण्यात आले होते. रुपाली चाकणकर यांना खरातच्या प्रकरणात सहआरोपी केले पाहिजे. रुपाली चाकणकर आणि खरात मिळूनच रॅकेट चालवत होते. म्हणूनच चाकणकर यांच्याकडून खरातला वाचवण्याचा प्रयत्न चालू होता. तुमच्या या खाणेरड्या प्रकारामुळेच आमच्या महाराष्ट्रातील माता-भगिणींवर देवाच्या नावाखाली भीती दाखवून लैंगिक अत्याचार झाला आहे, असा खळबळजनक आरोपही रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला.

त्या टेबलावर देवाच्या नावाखाली…

तसेच रुपाली चाकणकर या छानपैकी पदावर बसल्या होत्या. पण आमच्या माता-भगिनींची इज्जत त्या टेबलावर देवाच्या नावाखाली घाबरवून उतरवली गेली. त्यावेळी चाकणकर कुठे होत्या. चाकणकर यांनी पेटून उठायला हवे होते, असा हल्लाबोलही त्यांनी केला. दरम्यान, आता रुपाली ठोंबरे पाटील यांच्या या टीकेनंतर रुपाली चाकणकर नेमकं काय उत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ठाकरेंना जे जमलं नाही ते आता ममता बॅनर्जी करून दाखवणार? बंडखोर खासदारांच्या अडचणी वाढल्या, तृणमूलच्या गोटातून सर्वात मोठी बातमी
  • आगीची भीषण घटना 16 पैकी 15 नवजात बालकांचा मृत्यू, इस्लामाबादमधील रुग्णालयाला आग..
  • Tukaram Mundhe: सुट्या तेलावर तुकाराम मुंढेंचा कडक निर्णय, अखेर मुख्यमंत्र्यांना करावा लागला हस्तक्षेप; फडणवीस म्हणाले..
  • कृती सेनॉनच्या तोकड्या कपड्यांचा वाद अखेर शमला, घेतला मोठा निर्णय
  • देशावर नवे संकट! थेट मंत्री आयसीयूमध्ये, H1N1 फ्लूची नेमकी लक्षणे काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in