• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तो व्हिडीओ खोटा, विश्वास ठेवू नका.. पेपर लीक झाल्याच्या दाव्यावर NTA चं स्पष्टीकरण

June 22, 2026 by admin Leave a Comment


वैद्यकीय प्रवेशासाठीचीदेशातील सर्वात मोठी परीक्षा ‘ NEET-UG 2026’ (NEET-UG 2026) ची पुनर्परीक्षा रविवारी (21 जून) पार पडली. यावेळी 22 लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. या परीक्षेत कोणत्याही प्रकारची अनियमितता अथवा गैरप्रकार होऊ नये यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. मात्र याच दरम्यान, प्रश्नपत्रिका फुटल्याचा (पेपर लीक) दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता; अखेर याप्रकरणी ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ने (NTA) एक निवेदन जारी केलं आहे.

खरंतर सोशल मीडियावर रविवारी एक व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यातमध्ये ‘नीट-यूजी’ (NEET-UG) 2026 ची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) हा दावा फेटाळून लावला असून तो व्हिडिओ बनावट असल्याचे म्हटले. कडक सुरक्षा आणि देखरेखीखाली ही परीक्षा यशस्वीपणे पार पडल्याचे एजन्सीने सोशल मीडियावरील निवेदनाद्वारे स्पष्ट केलं.

सोशल मीडिया वर व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ वेगाने फिरतोय, NEET (UG) 2026 च्या पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका, ही परीक्षेपूर्वीच टेलिग्रामवर लीक झाली होती, असा दावा त्यामध्ये केला होता.  या व्हिडिओमुळे खळबळ उडाली अन् पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं.

मात्र हा व्हिडीओ फेक असल्याचे एनटीएने स्पष्ट केलं. NEET (UG) पुनर्परीक्षेबाबत सोशल मीडियावर एक बनावट व्हिडिओ फिरत आहे, मात्र अशा माहितीवर विश्वास ठेवू नका अथवा ती शेअर करू नका, असं आवाहन संस्थेने या निवेदनाद्वारे केलं. “NEET-UG 2026 बाबत सोशल मीडियावर फिरत असलेल्या एका बनावट व्हिडिओकडे NTA चे लक्ष वेधलं गेलं आहे. हा व्हिडिओ बनावट असून त्यातील दावे चुकीचे आहेत.” असं संस्थेने निवेदनात नमूद केलं.

संबंधित लोकांवर कठोर कारवाई

विद्यार्थ्यांना फसवण्यासाठी किंवा त्यांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी अशी दिशाभूल करणारी माहिती तयार करणे आणि ती जाणीवपूर्वक पसरवणे हा एक गंभीर गुन्हा आहे, असं एजन्सीने स्पष्ट केलं. “NTA ही संस्था I4C आणि कायदा अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांच्या मदतीने, ही माहिती प्रसारित करण्यास कारणीभूत असलेल्यांविरुद्ध कारवाई करत असल्याचं एजन्सीने नमूद केलं.”

📌 OFFICIAL STATEMENT | NEET (UG) 2026

NTA’s attention has been drawn to a fabricated video being circulated on social media regarding NEET (UG) 2026. The video is FAKE and the claims it makes are false. The examination was conducted successfully today under comprehensive…

— National Testing Agency (@NTA_Exams) June 21, 2026

विद्यार्थी आणि पालकांना आवाहन काय ?

याप्रकरणाच्या माहितीसाठी केवळ अधिकृत संकेतस्थळ (http://neet.nta.nic.in) आणि संस्थेच्या पडताळणी केलेल्या सोशल मीडिया हँडल्सवरच अवलंबून रहा, असं आवाहन NTA ने विद्यार्थी, पालकांना केलं.20 लाखांहून अधिक उमेदवारांसाठी शांततापूर्ण आणि निष्पक्ष प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे, असं NTA ने नमूद केलं.

20 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

रविवारी पार पडलेल्या ‘नीट’ (NEET) पुनर्परीक्षेला 20 लाखांहून अधिक उमेदवार बसले होते. 3 मे रोजी झालेली परीक्षा पेपरफुटीमुळे यापूर्वी रद्द करण्यात आली होती; या घटनेने देशभरात मोठा गदारोळ निर्माण झाला होता. त्यावरून मोठा राजकीय वादही पेटला आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली होती.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IMD Monsoon Update : पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे; या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, हवामान विभागाकडून मोठा इशारा
  • 27 वर्षे जुन्या चित्रपटाचा ओटीटीवर धुमाकूळ; ट्रेडिंगमध्ये टॉपर बनलाय ब्लॉकबस्टर
  • विना तिकीट प्रवास आता महागणार, रेल्वेकडून फुकट्या प्रवाशांसाठी आता आणखी कठोर तरतूद
  • PF नॉमिनेशन केले नाहीये? खातेधारकाच्या मृत्यूनंतर क्लेम कसा आणि कोणाला मिळतो? पाहा सविस्तर कायदेशीर प्रक्रिया
  • बँकेपेक्षा जास्त कमाई! जून 2026 मध्ये NBFC FD मध्ये गुंतवणुकीची सुवर्णसंधी, पाहा लेटेस्ट व्याजदरांची यादी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in