• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तोच चेहरा, तेच डोळे…., 8 वर्षांनंतर हुबेहूब श्रीदेवी यांच्यासारख्या दिसणारी तरुणी समोर, Video पाहून चाहते हैराण

July 29, 2026 by admin Leave a Comment


सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात, पण त्यातील काही फोटो आणि व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतात. इन्स्टाग्रामने तर अनेकांना नवीन ओळख मिळवून दिली आहे. सोशल प्लॅटफॉर्ममुळे प्रत्येकाला स्वतःची कला आणि आवड सादर करण्यासाठी नवीन मंच मिळाला आहे. सध्या एका तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओत दिसणारी तरुणी हुबेहूब दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्यासारखी दिसत आहे… असं अनेक नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. तरुणीचा नाव भूमिका तिवारी असं असून ती श्रीदेवी यांच्या आयकॉनिक गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. भूमिका हिने नुकताच, ‘चालबाज’ सिनेमातील लोकप्रिय गाणं ‘किसी के हाथ ना आएगी ये लडकी’ गाण्यावर डान्स केला आहे. सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, भूमिका तिवारी हिने श्रीदेवी यांचा लूक फॉलो करत, त्याच शैलीत गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिने ज्या सुंदर पद्धतीने हावभाव आणि डान्सच्या स्टेप सादर केल्या, त्यामुळे प्रेक्षक भारावून गेले. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने श्रीदेवी यांना आदरांजलीही वाहिली आहे. इन्स्टाग्रामवर भूमिकाचे दहा लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि तिच्या प्रोफाईलवरील बहुतेक व्हिडिओ हे श्रीदेवी यांच्या गाजलेल्या गाण्यांवर आधारित आहेत. ज्यामुळे ती श्रीदेवी यांची फार मोठी फॅन असल्याचं दिसून येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumika Tiwari (@bhumikatiwari.official)

भूमिका हिच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

व्हिडीओला आतापर्यंत 1 लाख लोकांपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी लाईक केलं आहे. कमेंट्स सेक्शनमध्ये युजर्सनी भूमिकाचा डान्स, हावभाव आणि स्क्रीन प्रेझेन्सचं कौतुक केलं आहे. एका युजर कमेंट करत म्हणाला, “असाधारण प्रतिभा; तिचे हावभाव आणि अभिनय अप्रतिम आहेत.” दुसरा नेटकरी म्हणाला, “तिचा डान्स पाहताना जणू काही श्रीदेवीच पुन्हा पडद्यावर अवतरली आहे, असं वाटलं.” त्याचबरोबर, अनेकांनी तिला बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्याचा सल्लाही दिला. मोठ्या संख्येने युजर्सनी ‘हार्ट इमोजी’ वापरून तिच्या सादरीकरणाचे कौतुक केले.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • साखर कारखान्याबाहेर सभासदांची झुंबड, स्मार्ट बाजारामध्ये साखरेबाबत मोठा निर्णय, 1 व्यक्तीला एकच..
  • Abhijeet Dipke: तू ये तर तुझा खेळ संपवून टाकतो आणि कायमचाच… अभिजीत दिपके यांना मिळाली धमकी
  • शाळेत हिजाब घालावा की घालू नये? कोर्टाचा मोठा निर्णय; थेट इस्लामचा उल्लेख
  • Shweta Tiwari: श्वेता तिवारीचं मुंबईतील आलिशान घर! ग्लास डोअर, सुंदर बाल्कनी अन् खास रीडिंग कॉर्नरने वेधलं लक्ष
  • अभिजीत दीपकेंच्या मनातील बेस्ट CM कोण? पटकन नाव सांगितलं, कारण देत म्हणाले…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in