• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तुम्ही तुमचा Aadhaar App पिन विसरलात का? घरबसल्या फक्त ‘या’ 5 सोप्या स्टेप्स फॉलो करून नवीन PIN करा सेट

August 8, 2026 by admin Leave a Comment


आजच्या युगात कोणतेही काम असो आधार कार्ड आपल्या प्रत्येकाजवळ असणे खूप महत्वाचे आहे. आपली ओळख दाखवण्यासाठी आधारकार्ड हे एक प्रुफ आहे. तसेच आजच्या डिजिटल काळात प्रत्येकजण फोनमध्ये आधार ॲपचा वापरत करत आहे. अशातच तुमच्या आधार ॲपची सुरक्षा सुनिश्चित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमची आधार-संबंधित वैयक्तिक माहिती सुरक्षित राहावी आणि त्या महितीचा गैरवापर टाळता यावा, यासाठी ॲपचा पिन वेळोवेळी बदलला पाहिजे. तुम्हाला तुमच्या आधार ॲपचा पिन कसा बदलायचा हे माहीत नसेल तर चिंता करू नका. कारण आता तुम्ही घरबसल्या काही सोप्या स्टेप्सच्या मदतीने आधार पिन अपडेट करू शकता. चला तर मग आजच्या लेखात आपण आधार पिन अपडेट करण्याची सोपी स्टेप्स जाणून घेऊयात.

आधार ॲपचा पिन बदलण्याचे 5 सोप्या स्टेप्स

सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये आधार ॲप उघडा आणि जुन्या पिनच्या मदतीने लॉग इन करा.

लॉग इन केल्यानंतर अॅपच्या प्रोफाइल किंवा सेटिंग्ज विभागात जा. येथे तुम्हाला सुरक्षेशी संबंधित पर्याय मिळतील.

आता ‘Change PIN’ किंवा ‘Update PIN’ या पर्यायावर क्लिक करा.

सर्वप्रथम तुमचा जुना पिन टाका. त्यानंतर तुमचा नवीन पिन टाका आणि तोच पिन पुन्हा टाकून त्याची पुष्टी करा.

आता सबमिट किंवा सेव्ह बटणावर टॅप करा. पिन यशस्वीरित्या बदलल्यानंतर त्याची माहिती स्क्रीनवर दिसेल. पुढच्या वेळी आधार ॲप उघडल्यावर तुम्हाला नवीन पिन वापरावा लागेल.

तुम्ही तुमचा पिन विसरल्यास काय करावे?

तुम्ही तुमचा आधार ॲप पिन विसरला असाल, तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही ॲपमधील ‘Forgot PIN’ या पर्यायाचा वापर करून नवीन पिन तयार करू शकता. यासाठी ओटीपी पडताळणी आवश्यक आहे. कृपया लक्षात घ्या की ओटीपी तुमच्या आधार कार्डशी जोडलेल्या त्याच मोबाईल नंबरवर पाठवला जाईल.

आधार ॲपचा पिन बदलणे का आवश्यक आहे?

आधार ॲप आधारशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती सुरक्षित ठेवते. तुमचा फोन हरवल्यास किंवा कोणाला तुमचा पिन कळल्यास, तुमची वैयक्तिक माहिती धोक्यात येऊ शकते.

त्यामुळे तुमच्या डिजिटल सुरक्षेसाठी वेळोवेळी तुमचा पिन बदलणे ही एक चांगली सवय आहे. यामुळे तुमचे आधार ॲप अधिक सुरक्षित राहते आणि गैरवापराचा धोका कमी होतो.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 2 जेसीबी, 8 थार, 175 दुचाकी जिंकणारा मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड
  • Nagpur : नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
  • Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
  • जर कोणाला वाटत असेल की भारतात मुस्लिम नसावेत, तर तो हिंदू नाही; न्यूयॉर्कमध्ये मोहन भागवत यांचे वक्तव्य
  • प्रवाशांना सामावून घेण्यासाठी रेल्वे मार्गाचे चौपदरी होणार, या 7 मार्गांवर चालणार काम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in