
स्टॉक मर्केट एक असं ठिकाण आहे, जेथे संपूर्ण माहिती असेल तरच पाय ठेवलेलं बरं… नाहीतर मोठ्या नुकसानाचा देखील सामना करावा लागतो. तर काहींचा फायदाच फायदा होतो. स्टॉक मार्केटमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही… अशात स्टॉक मार्केटवर आधारित अनेक सिनेमे, सीरिज आहेत, ज्या तुम्हाला शेअर मार्केटमधील डावपेच शिकवतील… बॉलिवूड आणि हॉलिवूडने शेअर मार्केटवर आधारित असे अनेक सिनेमे बनवले आहेत, ज्यामध्ये मध्ये असं काही दाखवण्यात आलं आहे, जे पाहिल्यानंतर तुम्ही हैराण व्हाल… असे सिनेमे, सीरिज ज्यांची कथा तुम्हाला अनेक विचार करण्यासाठी भाग पाडतील…
2013 मध्ये प्रदर्शित झालेला ‘द वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट’ एक उत्तम स्टॉक मार्केटवर आधारित सिनेमा आहे. सिनेमा अभिनेता लियोनार्डो डिकॅप्रियो याने मुख्य भूमिका साकारली आहे. सिनेमाची कथा एका ब्रोकर भोवती फिरते, ज्याला आयुष्यात यशाच्या उच्च शिखरावर पोहोचायचं असतं. पण तेव्हाच भ्रष्टाचार, ड्रग्स आणि आर्थिक घोटाळ्यामुळे तो धडकन जमीनीवर कोसळतो… हा सिनेमा तुम्ही जियो हॉटस्टारवर मोफत पाहू शकता.
अभिनेता सैफ अली खान ‘बाजार’ सिनेमात देखील एक उत्तम सिनेमा आहे. ज्यामध्ये स्टॉक मार्केटमध्ये सतत होणाऱ्या चढ – उतारांबद्दल दाखवण्यात आलं आहे. सिनेमाची कथा एका कपटी उद्योजकाभोवती फिरत आहे… ज्याला एक व्यक्ती स्वतःसाठी प्रेरणा मानतो… तो लवकरच त्या उद्योजकासोबत काम देखील करु लागतो… पण तोच उद्योजक त्याला मोठ्या जाळ्यात अडकवतो…
2020 मध्ये कोरोना काळात दिग्दर्शत हंसल मेहता यांची अशी एका सीरिज प्रदर्शित झाली. जी पाहण्यासाठी सगळेच उत्सुक होते. ‘स्कॅम 1992: द हर्षद मेहता स्टोरी’ ही सीरिज शेअर बाजारातील घोटाळ्याची कहाणी सांगते. 1992 मध्ये एका पत्रकाराने हर्षद मेहताचा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आणला. या मालिकेत शेअर बाजाराशी संबंधित प्रत्येक लहान-मोठा तपशील समाविष्ट आहे. ही सीरिज तुम्ही सोनी लिववर पाहू शकता.
‘द बिग शॉर्ट’ हा हॉलीवूड सिनेमा 2007-2008 मध्ये अमेरिकेवर आलेल्या मोठ्या आर्थिक संकटावर आधारित सत्य घटनेवर आधारित आहे. सिनेमा काही हुशार गुंतवणूकदारांची कथा सांगतो, ज्यांच्या लवकरच लक्षात आलं की अमेरिकेचा रियल एस्टेट मार्केट अत्यंत बिकट परिस्थितीत आहे आणि लवकरच कोसळेल. त्यांनी बँकांच्या विरोधात पैज लावली आणि अब्जावधींचा नफा कमावला. हा सिनेमा तुम्ही नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम व जिओ हॉटस्टारवर पाहू शकता.
1987 मध्ये देखील ‘वॉल स्ट्रीट’ नावाचा एक दमदार सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालेला. ज्याने शेअर बाजाराचा खेळ सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर, लोभ आणि श्रीमंत होण्याची इच्छा यामागील वास्तवही दाखवलं, ज्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. हा सिनेमा तुम्ही ॲपल टीव्हीवर रेंटने पाहू शकता.
Leave a Reply