
हॉटेलमधील चपला केवळ खोलीत फिरण्यासाठीच नसतात, तर बाथरूमला जाताना-येतानाही घालता येतात. बाथरूमच्या ओल्या फरशीवर अनवाणी चालल्याने तुमचे पाय ओले आणि निसरडे होऊ शकतात. या कराणासाठी देखील स्लिपर्स असतात.
हॉटेलच्या खोल्यांमध्ये संगमरवरी, फरशा किंवा लाकडी जमीन असू शकते. जमीन थंड लागू शकते, विशेषतः एसी असलेल्या खोल्यांमध्ये. त्यामुळे, हलक्या वजनाचे स्लीपर्स तुमच्या पायांमध्ये आणि जमिनीमध्ये एक थर तयार करतात.
हॉटेलमध्ये पोहोचण्यापूर्वी तासनतास प्रवास केल्यानंतर, सतत बूट घालून राहिल्याने त्रास होतो. अशा परिस्थितीत, चप्पल घातल्याने अधिक आराम मिळतो. याच कारणामुळे, हॉटेलमधील चपला केवळ आरोग्यदायीच नव्हे, तर पाहुण्यांच्या आरामाचा आणि पाहुणचाराच्या अनुभवाचा एक भाग म्हणूनही मानल्या जातात,
डिस्पोजेबल स्लीपर्स थोड्या कालावधीसाठी वापरून नंतर टाकून देण्यासाठी असतात. ते हलक्या वजनाच्या साहित्यापासून बनवलेले असतात, त्यामुळे ते घालण्यास आणि हॉटेलमध्ये ठेवण्यास सोपे असतात.
सांगायचं झालं तर, हॉटेलच्या खोल्यांमध्ये दिलेले सर्वच स्लीपर्स एकदाच वापरून फेकून देण्यासारखे नसतात. काही हॉटेल्स पुन्हा वापरता येण्याजोगे किंवा अधिक टिकाऊ स्लीपर्स देतात.




Leave a Reply