• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तुमची बायको तुम्हाला आवरत नाही आणि तुम्ही… ठाकरेंच्या उपनेत्याची रवी राणांवर खोचक टीका

June 17, 2026 by admin Leave a Comment


महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार फुटले आहेत. हे खासदार लवकरच वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. खासदारांचा हा गट एखाद्या पक्षात सामील होणार की शिवसेनेत सामील होणार याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. अशातच ठाकरेंच्या फुटलेल्या सहा खासदारांनी गट स्थापन करून माझ्या युवा स्वाभिमान पार्टीत यावं असं आमदार रवी राणा यांनी म्हटलं होतं. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

काय म्हणाले होते रवी राणा?

ऑपरेशन टायगरवर बोलताना रवी राणा यांनी, ‘जैसी करणी वैसी भरणी’. ठाकरेंच्या फुटलेल्या सहा खासदारांनी गट स्थापन करून माझ्या युवा स्वाभिमान पार्टी यावं अशी खुली ऑफर देताना ठाकरेंचे आणखी दोन खासदार माझ्या संपर्कात असल्याचे विधान केले होते. पुढे बोलताना त्यांनी ठाकरे गट पूर्ण खाली होणार आहे, ठाकरे गटात फक्त उद्धव ठाकरे आणि संजय राऊत राहणार आहेत. मुख्यमंत्री असताना हनुमान चालीसा वाचली म्हणून नवनीत राणा आणि मला 14 दिवस दिवस उद्धव ठाकरे यांनी जेल मध्ये टाकलं होतं असंही राणा म्हणाले.

रवी राणा यांच्या ऑफरवर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी म्हटले की, रवी राणा तुमची बायको तुम्हाला आवरत नाही आणि तुम्ही दुसऱ्यांच्या खासदारांना पक्षात येण्याचे निमंत्रण देत आहात. तुमची बायको तुमच्या पक्षाचा तमाशा करून दुसऱ्या पक्षात गेली आधी ते बघा आणि तुम्ही दुसऱ्या पक्षातील खासदारांना स्वतःच्या पक्षात येण्याचं आमंत्रण देत आहात. तुमच्या बायकोला तुमच्याशी एकनिष्ठ राहायला सांगा. तुमच्या बायकोने तुमच्या पक्षाचा तमाशा मांडलाय ते आधी बघा, दुसऱ्याच्या पक्षात नाक खूपसायला जाऊ नका.

ठाकरेंचे कोणते खासदार फुटले?

हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे, उत्तर पूर्व मुंबईचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील, वाशिमचे खासदार संजय देशमुख, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि परभणीचे खासदार संजय जाधव यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in