• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तुकाराम मुंढे पुण्यात कसे आले? UPSC कधी केली, हॉस्टेलमध्ये ढेकणांमुळे झोप कशी यायची नाही, सांगितल्या आठवणी…

August 8, 2026 by admin Leave a Comment


आयएएस तुकाराम मुंढे यांची मुलाखत घेण्यात आली आहे, त्यात त्यांनी त्यांचा शैक्षणिक प्रवास कसा झाला याची सर्व माहिती उपस्थितांना सांगितली. तुकाराम मुंढे सध्या प्रचंड चर्चेत आहेत. त्यांनी आपला शैक्षणिक प्रवास आणि युपीएससीची तयारी आणि हॉस्टेलचे दिवस या सर्वांवर या मुलाखतीत भाष्य केले आहे. त्यांनी पुण्यातील आपला शैक्षणिक प्रवास सांगितला आहे.

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची मुलाखत घेण्यात आली आहे. या मुलाखतीत तुकाराम मुंढे म्हणतात की बीए झाल्यावर एमएला प्रवेश घेण्यासाठी आपण पुण्याला बसने आलो होतो. त्याआधी आपण पुण्यात कधीही आलेलो नव्हतो. शिवाजी नगर बस स्टँडला उतरल्यावर आपण पायीच चालत विद्यापीठात गेलो. राज्यशास्त्राच्या विभागात प्रवेश घेण्यासाठी गेलो. तिथे जो प्रशासकीय स्टाफ होता. त्यांना अर्ज दिला. तर ते म्हणाले, प्रवेश मिळेल, पण होस्टेल मिळणार नाही. मी म्हटलं, मी दुसरीकडे राहू शकत नाही. मी त्यांना चार पाच हॉस्टेलची नावे सांगितली. ते म्हणाले, बुक आहेत. मग त्यांनी मला एसपी कॉलेजला जायला सांगितल्याचे मुंढे यांनी सांगितले.

तुकाराम मुंढे म्हणाले की मी एसपी कॉलेजला प्रवेशासाठी अर्ज केला. पण हॉस्टेलमध्ये प्रवेशाची चिंता होती. त्यानंतर संध्याकाळी मी बसने घरी गेलो. त्यानंतर प्रवेश मिळाल्याचं काहीच कळलं नाही. त्यामुळे मी मराठवाड्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथेच यूपीएससी करता करता एमएही केल्याचे त्यांनी सांगितले.

त्यावेळी मी होस्टेलला किती होतो, प्रवेश मिळणार की नाही हे प्रश्न विचारले नाही. मनात द्वंद्व होतं. मी कुटुंबा व्यतिरिक्त एकटा कधी राहिलेलो नव्हतो. मनात अनामिक भीती मनात होती. राहणार कसा? घरापासून दूर राहायचं कसं? ही भीती मनात होती. मी यूपीएससीची तयारी केली. जयकर लायब्ररीत अभ्यास केला. पुणे विद्यापीठात एक मित्र राज्यशास्त्रात एमए करत होता. मी त्याच्या रुममध्ये पॅरासाईट म्हणून राहत होतो. तिथे गेल्यावर पाहिलं की ढेकणं भरपूर होते. झोपच येत नव्हती. मी म्हटलं, अरे ढेकणं भरपूर आहेत. हे सांगितलं असतं तर आलोच नसतो.

लोक म्हणतात  चायनीज फूडवर कारवाई करा

नंतर एमपीएससी करताना फर्ग्युसन रोडवरच्या रानडे लायब्ररीत मी अभ्यास केला. पुणे विद्यापीठात चायनीज गाड्या असायच्या. पाषाण रोडला. मी विचार केला. तिथे जाऊन पाहावं का? माझं पहिलं चायनीज फूड मी तिथे खाल्लं. पण तोपर्यंत मला चायनीज फूड माहीत नव्हतं. आता भरपूर चायनीज फुडला डिमांड आहे. मी काही कारवाया केल्या. लोक म्हणतात आता चायनीज फूडवर कारवाई करा म्हणतात. आता पुढं लक्ष द्यायचं आहे असेही तुकाराम मुंढे यावेळी म्हणाले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • एअरपोर्टवर अमित शाह अन् एकनाथ शिंदेंची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये एकांतात दहा मिनिट चर्चा, शिंदेंना मिळालं मोठं आश्वासन
  • सलमान खानच्या या व्हिडीओने जिंकले लोकांचे मन, तो व्हिडीओ व्हायरल होताच काैतुक, भिंतीवर..
  • Mohan Bhagwat : आज रात्री मोहन भागवत प्रसिद्ध मॅडिसन स्क्वेअर येथून करणार संबोधित
  • तिला एअर अ‍ॅम्ब्युलन्समधून नागपुरात आणा… महिलेची काठमांडूत बिघडली तब्येत; कुटुंबीयांचा फडणीस, गडकरींकडे टाहो
  • सुष्मिता सेनच्या दत्तक मुलीचं हटके ट्रान्सफॉर्मेशन, ग्लॅमरस अदांवर चाहते फिदा, अभिनेत्रीने शेअर केलेत फोटो

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in