• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तुकाराम मुंढेंची टीम भेंडीबाजारात घुसली… घाणेरडं किचन, किटकांची भुणभुण… मुंबईतील तीन नामांकित हॉटेलांचे परवाने निलंबित

July 14, 2026 by admin Leave a Comment


अन्न आणि औषध विभागाने गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे. कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे यांनी FDA च्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून अनेक ठिकाणी धाडी टाकून विविध हॉटेल्सवर मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. अशातच आता मुंबईतही अन्न आणि औषध विभागाने धडक कारवाई केली आहे. मुंबईतील तीन नामांकित हॉटेलांचे अन्न परवाने निलंबित करण्यात आली आहे. यात भेंडीबाजार व उमरखाडीतील तीन नामांकित हॉटेलांचा समावेश आहे.

मुंबईतील नामांकित हॉटेलचे परवाने रद्द

समोर आलेल्या माहितीनुसार, शालिमार हॉस्पिटॅलिटी, नूर मोहम्मदी हॉटेल आणि रहमानिया रेस्टॉरंटचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. या हॉटेल्सनी स्वच्छता, अन्नसुरक्षा व परवाना नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या हॉटेल्सच्या स्वयंपाकघरात अस्वच्छता, कीटकांचा वावर आढळून आला, तसेच पिण्याच्या पाण्याबाबतचे नियमही या हॉटेल्सनी पाळले नसल्याचे समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

पुढेही कारवाई सुरू राहणार

अन्न आणि औषध विभागाने केलेल्या तपासणीत कच्च्या मालाच्या नोंदी व खाद्यतेलाच्या गुणवत्तेच्या नोंदी नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या हॉटेल्सचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. त्याचबरोबर अमरावतीतील ‘अमरावती दरबार’ला विना वैध अन्न परवाना व्यवसाय बंद करण्याची नोटीस देण्यात आली आहे. या कारवाईनंतर अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे FDAने स्पष्ट केले आहे.

FDA चे हॉटेल्ससाठी महत्त्वाच्या सूचना

  • स्वच्छ पिण्याचे पाणी: हॉटेल्समध्ये ग्राहकांना मोफत आणि स्वच्छ पिण्याचे पाणी देणे बंधनकारक करण्यात आले आहे. ग्राहकाला बळजबरीने बाटलीबंद (मिनरल) पाणी विकत घेण्याची सक्ती करता येणार नाही.
  • शाकाहारी आणि मांसाहारी अन्न वेगळे: शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची साठवणूक आणि स्वयंपाक पूर्णपणे स्वतंत्र असणे आवश्यक आहे. यासाठी वेगवेगळे चॉपिंग बोर्ड वापरणे बंधनकारक आहे.
  • तेलाचा पुनर्वापर बंदी: तळण्यासाठी वापरलेल्या काळ्या किंवा जळालेल्या तेलाचा पुन्हा वापर करता येणार नाही. तेलाच्या गुणवत्तेबाबतच्या नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल.
  • अन्नाचे पॅकेजिंग: वृत्तपत्रांमध्ये अन्नपदार्थ पॅक करण्यास पूर्णपणे बंदी आहे. त्यासाठी प्रमाणित फूड-ग्रेड रॅपिंग पेपरचा वापर करणे आवश्यक आहे.
  • कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी: किचनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दरवर्षी वैद्यकीय तपासणी होणे आवश्यक आहे. तसेच स्वयंपाकघरात तंबाखू, गुटखा खाण्यास आणि थुंकण्यास सक्त मनाई आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘एकत्र जगलो, आता एकत्रच मरू…’; मरण समोर, पण आजारी नवऱ्याची साथ सोडण्यास नकार, रमायाची कहाणी डोळ्यात पाणी आणेल
  • Apple iPhone: पहिल्या फोल्डेबल आयफोनसह अजून एक मोठं सरप्राईज, ॲपलचा मोठा धमाका!
  • Rahul Gandhi : राहुल गांधींचा भाजप-RSS वर जोरदार हल्लोबाल; जन्म ते मृत्यू…देशात दलितांसोबत भेदभाव, दिले हादरवणारे पुरावे
  • जरांगेंची मागणी मान्य केली जाऊ शकत नाही, मागण्या चुकीच्या… गुणरत्न सदावर्ते यांची जोरदार टीका
  • मराठवाड्यात किती कुणबी प्रमाणपत्र वाटप? शासनाकडून आकेडवारीच समोर, उपोषणापूर्वी मनोज जरांगेंचा तो मोठा आक्षेप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in