
पुण्याच्या केतन अग्रवाल हत्याकांडात रोजरोज नवनवीन माहिती समोर येत आहे. केतन याची त्याच्या भावी पत्नी सिया गोयल हिने बॉयफ्रेंडच्या मदतीने थंड डोक्याने हत्या केल्याने हे प्रकरण चर्चेत आहे. काल रात्रीत केतनच्या कुटुंबियांनी पिंपरीतील केतनच्या सोसायटीतील लोकांनी कँडल मार्च काढला होता. या प्रकरणाचा क्राईम सीन रिक्रिएट करण्यासाठी लोणावळा पोलीस आरोपी सिया आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी या दोघांना लोहगडावरुन घेऊन गेले होते. या प्रकरणात आता नवीनच माहिती उघडकीस आली आहे.
केतन याला लोहगडावर ढकलून दिल्यानंतर सियाने तिच्या आईला प्रथमच ही गोष्ट सांगितली. त्यानंतर तिच्या आईने केतनच्या वडिलांना असा प्रकार घडल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांना या प्रकरणात संशय येऊ लागला होता. केतन हा ट्रेकर होता तो सहजा सहजी तोल जाऊन पडले असे पोलिसांना अजिबात पटत नव्हते. पोलिसांनी सिया हीला विचारले तेव्हा तिने आधी फोटो काढताना केतनचा तोल गेल्याचे सांगितले. पोलिसांनी दोघांचे फोन तपासले तेव्हा त्या दिवसाचा एकही फोटो न मोबाईलमध्ये न आढळल्याने पहिल्यांदा पोलिसांना काही तरी काळेबेरे असल्याचा संशय आला. त्यानंतर सिया हीच्या फोनवर एका व्यक्तीशी २००८ कॉल झाल्याचे आढळले. त्यानंतर पोलिसांना चेतन चौधरी या तिच्या बॉयफ्रेंडचा पत्ता लागला. चेतन याने त्या दिवशी त्यांच्या फोनचे नेटवर्क संपूर्ण दिवस बंद ठेवले होते आणि त्याचा फोन दुकानात मित्राकडे ठेवला होता.
इतक्या उष्णतेत हुडी घातली !
लोहगडच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज तपासताना ३३ डिग्री तापमानात हुडी घालून आलेली एक व्यक्ती दिसल्याने पोलिसांनी संशय आला. या व्यक्तीने चेहरा लपवला होता. ही व्यक्ती सियाच्या हिच्या मागे थोड्या अंतरावर उभी होती. सिया सारखी मागे वळून या व्यक्तीकडे पाहात असल्याचे दिसत होते. तो चेतन असल्याचे नंतर उघडकीस आले. आता पोलिसांनी केलेल्या तपासात सिया हीला चेतन चौधरी याच्याशी लग्न करायचे होते. परंतू चेतनने सेटल होण्यासाठी तीन वर्षे थांबण्याचा सल्ला तिला दिला होता.
परंतू सिया आणि केतन अग्रवाल या दोघांच्या कुटुंबियांनी त्यांचे लग्न जुळवले आणि साखरपुडाही करुन टाकला. सिया हीला चेतनने तीन वर्षे थांबायला सांगितले होते. त्यामुळे जर केतन याचा काटा काढला तर घरातले लोक तीन वर्षे तरी लग्नाचा विषय काढणार नाहीत आणि आपण चेतनशी लग्न करु शकू असा विश्वास सिया हीला होता. त्यामुळे केतन याचा काटा काढण्यासाठी सिया हीने चेतन याची मदत घ्यायचे ठरवल्याचे तपासात पुढे आले आहे.
वेषांतर करण्याचीही योजना होती
या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यापासूनच सिया आणि चेतन यांनी केतन अग्रवाल याची हत्या करण्याची योजना आखण्यास सुरुवात केली. त्यांनी गुगलवर हत्या करण्याच्या पद्धती सर्च केल्या होत्या. त्यांनी हत्येच्या कटाची रिहर्सल करण्यासाठी लोहगड किल्ल्याचा दौराही केला होता. पकडले गेल्या पोलिसांना काय उत्तरे द्यायची याचीही तयारी आणि अभ्यास केला होता. दोन्ही आरोपींनी संशयापासून वाचण्यासाठी हत्येदरम्यान वेषांतर करण्याचीही योजना आखली होती.
१४ जून रोजी वाढदिवसाच्या निमित्ताने सिया याने केतनला लोहगडावर नेऊन ढकल्याचा प्रयत्नही केला होता. मात्र, केतन याने फांदी पकडल्याने तो वाचला, त्यानंतर सिया हीने साप दिसल्याने माझा धक्का लागल्याचे नाटक उत्तम वठवले. मात्र, केतनला सिया आणि चेतनला पुन्हा १७ जूनला नेले आणि यावेळी मात्र त्याला गडावरुन ढकलण्यात यश त्यांना यश आले. मात्र, पोलिसांच्या तपासाने त्यांचे बिंग फुटले.
Leave a Reply