• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तिला सोडल्याचा पश्चात्ताप नाही, म्हणणाऱ्या दीपिका पादुकोणच्या एक्स बॉयफ्रेंडचं ट्रोलिंगनंतर स्पष्टीकरण

July 13, 2026 by admin Leave a Comment


रणवीर सिंहशी लग्न करण्यापूर्वी अभिनेत्री दीपिका पादुकोणने रणबीर कपूर, सिद्धार्थ माल्या यांना डेट केलं होतं. मात्र यात एक नाव असंही होतं, जे फारसं त्यावेळी चर्चेत आलं नव्हतं. दीपिकाने अभिनेता आणि मॉडेल मुझम्मिल इब्राहिमला दोन वर्षे डेट केलं होतं. एका मुलाखतीत मुझम्मिल दीपिकासोबतच्या नात्याबद्दल आणि ब्रेकअपबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला होता. त्याच मुलाखतीची क्लिप आता पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहे. त्यामुळे लोकांना मुझम्मिलची ही मुलाखत नवी वाटत असून त्यावर अनेकजण विविध प्रतिक्रिया देत त्याच्यावर टीका करत आहेत. इतक्या वर्षांनंतर आणि आता दीपिकासोबतच्या नात्याबद्दल बोलणं गरजेचं आहे का, असा सवाल नेटकरी करत आहेत. या ट्रोलिंगनंतर अखेर त्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहित नेटकऱ्यांचा संभ्रम दूर केला आहे.

मुझम्मिलचं स्पष्टीकरण

इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित मुझम्मिलने म्हटलंय, ‘ज्या मुलाखतीची आता चर्चा होतेय, आणि ज्याला चुकीच्या पद्धतीने ‘नवा दावा’ म्हणून सादर केला जातोय, तो एक वर्षाच्याही आधी रेकॉर्ड करण्यात आला होता. आता जी क्लिप शेअर केली जातेय, ती त्या मोठ्या मुलाखतीमधील एक छोटा भाग आहे. मुलाखतीचं एडिटिंग करताना किंवा क्लिप्स स्वतंत्रपणे पाहताना अनेकदा त्यातील संकोच, संदर्भ आणि आदर हरवून जातो. मी माझ्या भूतकाळातील लोकांबद्दल नेहमी आदराने बोलण्याचा प्रयत्न केला आहे आणि आजही तेच कायम आहे. इतर अनेक लोकांप्रमाणेच मीसुद्धा गेल्या काही वर्षांपासून माझं काम आणी जीवन सुधारण्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. मला आशा आहे की या चर्चा त्याच विषयावर केंद्रीत राहतील. मी प्रामाणिकपणे आणि आदराने बोलण्यावर विश्वास ठेवतो.’

मुझम्मिलची पोस्ट-

 

View this post on Instagram

 

A post shared by Muzammil Ibrahim (@muzamilibrahim7)

मुलाखतीत दीपिकाबद्दल काय म्हणाला होता मुझम्मिल?

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत मुझम्मिल म्हणाला होता, “आम्ही दोन वर्षे एकमेकांना डेट केलं होतं. मुंबईत ती मला पहिल्यांदा भेटली होती आणि तीसुद्धा माझ्यासाठी पहिलीच होती. ते माझं पहिलं खरं नातं होतं. दीपिकानेच मला पहिल्यांदा प्रपोज केलं होतं. मी तिला सोडल्यामुळे आमचं ब्रेकअप झालं, पण मला त्याचा पश्चात्ताप नाही. मी कोणालाही सोडल्याचा कधीच पश्चात्ताप करत नाही. त्यावेळी मी एक स्टार होतो, ती नव्हती. ती मॉडेल होती. ब्रेकअपनंतर तिच्या लग्नाआधी आम्ही अधूनमधून बोलायचो. मात्र रणवीर सिंहशी लग्नानंतर आमचा संपर्क पूर्णपणे तुटला.”

दीपिका पादुकोणने नोव्हेंबर 2018 मध्ये अभिनेता रणवीर सिंहशी लग्न केलं. त्यानंतर सप्टेंबर 2024 मध्ये तिने मुलीला जन्म दिला. आता दीपिका पुन्हा गरोदर असून जानेवारी महिन्यात तिच्या दुसऱ्या अपत्याचा जन्म होऊ शकतो.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आदिवासी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून… नवनाथ बन यांचा काँग्रेस नेत्यावर तो गंभीर आरोप, म्हणाले राहुल गांधी…
  • Manoj Jarange On Hunger Strike | ‘कुणीही घरी बसू नका; अंतरवाली सराटीत या’ मनोज जरांगेचं मोठं आवाहन
  • मोठी बातमी! जरांगेंच्या आंदोलनाच्या एक दिवस आधीच राज्य सरकारचा मोठा निर्णय; थेट समितीलाच…
  • मोठी बातमी! भाजपच्या बड्या नेत्यावर जमावाचा जीवघेणा हल्ला, अहिल्यानगरमध्ये वातावरण पेटलं
  • Kriti Sanon: माफ करा, माझी मुलंही असे कपडे घालतात पण..; क्रिती सनॉनच्या जाहिरातीवर प्रियांका चोप्राची आई स्पष्टच बोलली..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in