• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ताशी 70 किमी वेग, 8 तास अत्यंत धोक्याची, चक्रीवादळ धडकणार, तब्बल 17 राज्यात..

June 1, 2026 by admin Leave a Comment


देशभरातील हवामानात मोठा बदल झाला. मॉन्सून दाखल होण्यापूर्वीच काही राज्यात चक्रीवादळासह पाऊस होतोय. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने तब्बल 17 राज्यांना मोठा इशारा दिला. पुढील काही तास या राज्यांकरिता धोकादायक असणार आहेत. यासोबतच गारपिटीचाही मोठा इशारा आहे. ईशान्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पीय प्रदेशात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. वायव्य, मध्य आणि पूर्व भारतातील अनेक भागांमध्ये सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस होईल. पावसाने देशात थैमान घातले. उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या मुसळधार पाऊस आणि चक्रीवादळात 31 पेक्षा अधिक लोकांचा जीव गेला. धोका अजूनही टळला नाही. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि या वादळादरम्यान घराबाहेर न पडता सुरक्षित स्थळी राहण्याचा सल्ला दिला.

हवामान विभागाने येत्या आठ तासांत 17 राज्यांना अलर्ट जारी केला. यादरम्यान ताशी 70 किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे. नैऋत्य मोसमी वारेही वेगाने पुढे सरकत आहेत. फक्त वारेच नाही तर ताशी 70 किलोमीटर वेगाने वारे वाहत असतानाच अतिमुसळधार पाऊस पडण्याचे संकेत आहेत. पुढील 8 तास धोक्याची आहेत.

महाराष्ट्रात देखील अवकाळी पावसासह गारपिटीचा मोठा इशारा देण्यात आला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पंजाब, उत्तराखंड, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिशा,  बिहार, झारखंड, जम्मू काश्मीर यांच्यासह अन्य काही राज्यात अवकाळी पाऊस हजेरी लावेल. हा अत्यंत मोठा इशारा देण्यात आला.

मौसम संबंधी चेतावनी

मुख्य बिंदु

(i) इस सप्ताह उत्तर-पूर्वी भारत और दक्षिणी प्रायद्वीपीय भारत में छिटपुट भारी वर्षा की संभावना है।

(ii) 31 मई को उत्तर-पश्चिमी, मध्य और उससे सटे पूर्वी भारत में 90 किमी प्रति घंटे तक की रफ्तार वाली तूफानी हवाओं के साथ मध्यम से गंभीर गरज-चमक और… pic.twitter.com/gHews8dDVZ

— India Meteorological Department (@Indiametdept) May 31, 2026

काही राज्यात पाऊस मोठे थैमान घालत आहे. प्रशासनाना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले. पुढील दोन ते तीन दिवस परिस्थिती  अशीच राहण्याची शक्यता आहे. अतिमुसळधार पावसासह काही राज्यात चक्रीवादळही असेल. भारतीय हवामान विभागाने (IMD) मान्सूनबाबत एक माहिती जारी केली आहे. हवामान विभागाच्या मते, मान्सूनचा वेग कायम आहे. पुढील 3 ते 4 दिवसांत मान्सून आग्नेय अरबी समुद्र, लक्षद्वीप, केरळ, तामिळनाडूचे काही अधिक भाग आणि बंगालच्या उपसागराच्या मोठ्या भागात पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल राहील.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ना शाहरुख, ना रजनीकांत, या अभिनेत्याने एका चित्रपटासाठी घेतलं 325 कोटी रुपये मानधन
  • ज्या जागेवर नमाज पठण, तेथे पंतप्रधान मोदींचा 35 हजार लोकांसोबत मोठा इतिहास, काँग्रेस नेत्याचा आक्षेप कारण…
  • या देशात फोन, सायकल आणि लगेज लॉक न लावता ठेवतात, कारण रंजक
  • Vaibhav Sooryavanshi: अरे ही तर अफवा आहे…श्रीलंकेला गपगार केल्यानंतर वैभव सूर्यवंशी काय म्हणाला?
  • मोठी बातमी! खासदारांच्या पक्षप्रवेशानंतर आता आणखी एका आमदाराचा शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा, शिंदेंनी गेम फिरवला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in