• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘तारक मेहता…’ला रामराम ठोकलेले कलाकार आता कुठे आहेत? एक तर चालवतो रेस्टोरेंट, नाव ऐकून…

July 16, 2026 by admin Leave a Comment


गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ही मालिका आजही तितकीच लोकप्रिय आहे. या मालिकेतील अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयामुळे घराघरांत ओळख निर्माण केली. मात्र, कालांतराने अनेक प्रसिद्ध कलाकारांनी मालिकेला निरोप दिला. सध्या हे कलाकार आपल्या वैयक्तिक आयुष्याबरोबरच विविध क्षेत्रांत कार्यरत असून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत.

शैलेश लोढा यांनी मालिकेत तारक मेहता यांची भूमिका साकारली होती. 2022 मध्ये निर्मात्यांसोबत झालेल्या सर्जनशील मतभेदांमुळे त्यांनी मालिका सोडली. सध्या ते टीव्ही आणि साहित्य क्षेत्रात सक्रिय असून ‘वाह भाई वाह’सारख्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करत आहेत. तसेच देश-विदेशातील कवी संमेलनांमध्येही ते सहभागी होत असतात.

गुरुचरण सिंह यांनी रोशन सिंह सोढीची भूमिका साकारली होती. 2020 मध्ये कौटुंबिक आणि आर्थिक कारणांमुळे त्यांनी मालिका सोडली. त्यानंतर काही काळ ते वैयक्तिक आणि आरोग्याशी संबंधित अडचणींमुळे चर्चेत होते. सध्या ते अभिनयापासून दूर असून दिल्लीत स्वतःचे रेस्टॉरंट चालवत आहेत.

दिशा वाकाणी यांनी दयाबेनच्या भूमिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळवली. 2017 मध्ये प्रसूती रजेवर गेल्यानंतर त्यांनी मालिकेत पुनरागमन केले नाही. दोन मुलांची आई असलेल्या दिशा सध्या अभिनयापासून दूर असून संपूर्ण वेळ कुटुंब आणि मुलांच्या संगोपनासाठी देत आहेत.

लहानपणी टप्पूची भूमिका साकारणाऱ्या भव्य गांधी याने 2017 मध्ये काहीतरी वेगळे करण्याच्या उद्देशाने मालिका सोडली. सध्या तो गुजराती चित्रपटसृष्टीत काम करत आहे

जेनिफर मिस्त्री बन्सीवाल यांनी मिसेस रोशन सोढीची भूमिका साकारली होती. 2023 मध्ये त्यांनी निर्मात्यांवर छळाचे गंभीर आरोप करत मालिका सोडली. सध्या त्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत.

भव्य गांधी यांच्यानंतर टप्पूची भूमिका करणारे राज अनादकट यांनी 2022 च्या अखेरीस मालिका सोडली. सध्या ते लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि व्लॉगर असून म्युझिक व्हिडिओ आणि विविध ब्रँडच्या जाहिरातींमध्येही झळकत आहेत.

सोनूची भूमिका साकारणाऱ्या झील मेहता यांनी 2012 मध्ये शिक्षणासाठी अभिनयाला रामराम ठोकला. त्यांनी एमबीए पूर्ण केल्यानंतर आईसोबत ब्युटी सलूनचा व्यवसाय सुरू केला असून सध्या त्या वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहेत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sharddha Kapoor : रस्त्यावर शॉपिंग, बिनधास्त हादडलं, श्रद्धा कपूर मुंबईच्या गल्लीबोळात भिर भिर भटकली; Video
  • काळंकुट्टं पाणी… काळाने मिठी मारावी असं दृश्य, ग्यिरोंग इमिग्रेशन सेंटर बघता बघता गेलं वाहून; Video
  • वैभव सूर्यवंशीला लागणार आणखी मोठी लॉटरी? माजी कर्णधारानेच सांगून टाकलं; कसोटी क्रिकेटमध्ये…
  • लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली…
  • MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; थेट अपर सचिवाला अटक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in