• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तापाने फणफणल्याने जंतर-मंतर सोडलेलं, आता झालं अभिजीत दीपकेंच्या आजाराचं निदान

July 25, 2026 by admin Leave a Comment


नवी दिल्लीच्या जंतर-मंतरवर विद्यार्थी आंदोलन पेटलं आहे. मागच्या एका महिन्यांपासून कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनासाठी अभिजीत दीपके मागील महिन्याभरासाठी मेहनत घेत आहेत. दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना बळजबरीने रुग्णालयात दाखल केल्यानंतर दीपकेंनी उपोषणाची घोषणा केली होती. त्यांनी काही दिवस आंदोलन केल्यानंतर जंतर-मंतरच्या स्टेजवरच उपोषण सोडलं होतं. त्यानंतर पुढील काही दिवसांत आजारी पडल्याने दीपके यांनी डॉक्टरांकडून उपचार घेऊन विश्रांती घेतली होती. त्यानंतर आज शनिवारी अभिजीत दिपकेंना टाइफाइड झाल्याचे वैद्यकीय अहवालातून समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नीट पेपरफुटीवरून जंतर-मंतरवरील आंदोलनाचं नेतृत्व करणारे अभिजीत दीपके यांना टाइफाइड झाल्याचे वैद्यकीय अहवालातून निश्चित झालं आहे. त्यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून टाइफाइड झाल्याचे सांगितले. तरीही धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात लढाई सुरू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.  व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटलं की, ‘माझी तब्येत बिघडली आहे. मला वैद्यकीय अहवालात टाइफाइड झाला आहे. त्यामुळे माझ्यावर उपचार सुरू आहेत.सकाळ आणि सायंकाळ माझ्यावर उपचार सुरू आहेत’.

 

Have been diagnosed with typhoid, but the fight will go on until Dharmendra Pradhan resigns! pic.twitter.com/8iHSZdF6K7

— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) July 25, 2026

आंदोलनावर परिणाम होणार का?

जंतर-मंतरवरून 20 जुलै रोजी सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी उचलून रुग्णालयात नेलं होतं. दिल्ली पोलिसांच्या कारवाईच्या निषेधार्थ अभिजीत दीपके यांनी उपोषण सुरू केलं होतं. त्याच्या काही दिवसांनंतर अभिजीत दीपकेंची तब्येत बिघडली होती. त्यामुळे डॉक्टरांनी तपासणी केली होती. त्यानंतर दीपकेंना टाइफाइड झाल्याचे स्पष्ट झालं आहे. दीपकेंची तब्येत बिघडल्याने आंदोलनावर परिणाम होणार असल्याचं बोलले जात आहे. परंतु आंदोलनावर परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे दोन प्रतिनिधी हे सातत्याने सरकारशी चर्चा करत आहे. दीपके आजारी असले, तरी त्यांचे इतर सहकारी आंदोलन हाताळत असल्याचे दिसत आहे.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in